अक्कलकोट पंचायत समिती सभापतिपदी आनंदराव सोनकांबळे !

अक्कलकोट पंचायत समिती सभापतिपदी आनंदराव सोनकांबळे !
अक्कलकोट पंचायत समिती सभापतिपदी आनंदराव सोनकांबळे!
अक्कलकोट पंचायत समिती सभापतिपदी आनंदराव सोनकांबळे!Canva
Updated on

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतिपदी कॉंग्रेसचे ऍड. आनंदराव सोनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट पंचायत समितीच्या (Akkalkot Panchayat Samiti) सभापतिपदी कॉंग्रेसचे ऍड. आनंदराव सोनकांबळे (Adv. Anandrao Sonkamble) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड यांनी ठरल्याप्रमाणे महिनाभरापूर्वी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. सोमवारी पंचायत समिती सभागृहात अध्यासी अधिकारी तहसीलदार अंजली मरोड (Tehsildar Anjali Marod) यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. या वेळी पंचायत समिती सदस्य सुरेखा काटगाव, प्रकाश हिप्परगी, अ. खय्युम पिरजादे, सुनंदा गायकवाड, गुंडप्पा पोमाजी, विलासराव गव्हाणे, सुरेखा गंदगे, अनिता ननवरे, भौरम्मा पुजारी, आनंदराव सोनकांबळे, राजेंद्र धुळप्पा बंदिछोडे आदी सदस्य उपस्थित होते. (Anandrao Sonkamble elected as Chairman of Akkalkot Panchayat Samiti-ssd73)

अक्कलकोट पंचायत समिती सभापतिपदी आनंदराव सोनकांबळे!
आमदार प्रणिती शिंदेंच्या वक्‍तव्याने महेश कोठेंची वाढली चिंता!

नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार अंजली मरोड यांनी जाहीर केले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नूतन सभापतिपदी निवड झाल्यावर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Former Minister of State Siddharam Mhetre), जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रथमेश म्हेत्रे, सुरेखा काटगांव, सुनंदा गायकवाड आदींच्या हस्ते नूतन सभापती आनंदराव सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

अक्कलकोट पंचायत समिती सभापतिपदी आनंदराव सोनकांबळे!
"ऑनलाइन' नुसतेच भारी, मुलांची पाटी कोरीच !

अध्यासी अधिकारी अंजली मरोड, सहाय्यक अध्यासी आधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी बी. डी. ऐवळे, एस. बी. मठ, आर. के. जाधव, बी. आर. गुरव, जी. व्ही. हिरेमठ आदींनी निवडीचे काम पाहिले. या वेळी विलास गव्हाणे, अरुण जाधव, काशिनाथ गोळ्ळे, विश्वनाथ हडलगी, गुरू म्हेत्रे, माजी सभापती महेश जानकर, कॉंग्रेसचे महिला तालुकाध्यक्ष मंगल पाटील, रामचंद्र गद्दी, दत्ता डोंगरे, सद्दाम शेरीकर, बाबासाहेब पाटील, मुबारक कोरबू, गोपीचंद लोंढे, शिवानंद पाटील, लक्ष्मण सोनकांबळे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()