Solapur : प्राणी संग्रहालयाच्या दवाखान्यास आडकाठी

त्रुटींच्या पूर्ततेसाठी महापालिकेची धडपड; पोलिस बंदोबस्ताची मागणी
Solapur
Solapur sakal
Updated on

सोलापूर : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाची मान्यता टिकविण्यासाठी केंद्रीय चिडीया घर प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता मुदतीत पूर्ण करण्यासाठी महापालिका धडपडत आहे. तर दुसरीकडे जागेचा वाद उपस्थित करीत कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दवाखान्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी महापालिकेनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

प्राणी संग्रहालय हे ‘स्मॉल कॅटेगरी’मध्ये मोडत असल्याने प्राण्यांच्या संख्येवर मर्यादा आहेत. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम हाती घेतले आहे. केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करा, अन्यथा प्राणी संग्रहालय बंद करा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गेली आठ महिने हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले.

प्राण्यांसाठी अत्याधुनिक दवाखाना, किचन स्टोअर, सुरक्षाभिंत तसेच तज्ज्ञ कर्मचारी नाहीत असे ३२ त्रुटींसह अतिरिक्त प्राणी इतरत्र पाठविण्याबाबतचेही आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय चिडिया घर प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता महापालिकेकडून दूर करण्यात येत असून, तीन महिन्यांपूर्वी अत्याधुनिक दवाखाना, किचन स्टोअर, सुरक्षाभिंत या कामांची टेंडर प्रक्रिया करून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.

तसेच प्राणी संग्रहालयातील प्राणी संग्रहालयाच्या संचालक व मॅटनिर्टी पदावर नियुक्ती देत केंद्रीय चिडीया घर प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात येऊन केद्र शासनाकडे मान्यता कायम ठेवण्याबाबतचा अहवाल पाठविला असून दवाखान्याच्या उभारणीसाठी तीन महिन्यांची मुदत मागितली आहे. मात्र, दवाखाना उभारण्याच्या कामात प्रकाश गडदुरे नामक व्यक्तींकडून अडथळा आणण्याचे काम सुरू आहे. पोलिस बंदोबस्तात हे काम पूर्ण करून घेण्यासाठी महापालिकेने पोलिस प्रशानाला बंदोबस्ताची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.