Annabhau Sathe Birth Anniversary 2022 : बदललेल्या प्रश्‍नांसह शाहिरीही झाली हायटेक

शाहीर रमेश खाडे यांची तीस वर्षांची सेवा
Annabhau Sathe
Annabhau Sathe sakal
Updated on

सोलापूर : स्वातंत्र्याची चळवळ असो की संयुक्त महाराष्ट्राचा लढा, यासह प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी शाहिरीने मोलाची भूमिका बजावली आहे. काळ बदलला, बदलत्या काळासोबत आता प्रश्नही बदलले. शाहिरीने आजही सामाजिक प्रश्नांवर वाचा फोडण्याचे काम अविरत सुरूच ठेवले आहे. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या जमान्यात शाहिरीही हायटेक झाली आहे. जत्रा व मेळाव्यांमधून पूर्वी शाहीर प्रबोधन करत होते. आता सोशल मीडियातून शाहीर सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत आहेत.

सोलापूरचे शाहीर रमेश खाडे यांनी शालेय जीवनापासून शाहिरीची लागलेली गोडी जोपासली आहे. तब्बल तीस वर्षे त्यांनी शाहिरीची सेवा केली आहे. जलसंधारण विभागात कार्यरत असलेल्या शाहीर रमेश खाडे यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर शाहिरीतून आवाज उठविला आहे. मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूलचे संगीत शिक्षक एम. वाय. पाटील यांच्याकडून शाहीर रमेश खाडे यांना शाहिरीची गोडी लागली. त्यांच्या या शाहिरीचा सन्मान जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी जलशाहीर पुरस्कार देऊन केला आहे.

शाहीर रमेश खाडे म्हणतात, अकराव्या शतकात शाहिरी कलाप्रकार जन्माला आला, यामध्ये शूरवीरांचे गोडवे गाणारे पोवाडे, प्रेरणादायी लोकगीते, स्फूर्तिगीते यांचा समावेश झाला. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात शूर रसांची बरसात करणारा शाहिरी हा कलाप्रकार समाजात लोकप्रिय झाला, तो खोलवर रुजला आणि तो राजमान्य व लोकमान्यही झाला. १६ व्या शतकात या शाहिरी कला प्रकारात पोवाडे, लोकगीतांसोबत गोंधळ गीतांचीही भर पडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्दुमकीसोबत गनिमीकाव्याच्या प्रेरक कथाही रयतेसमोर मांडल्या गेल्या.

सध्या व्यसनमुक्ती, जलसाक्षरता, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, मुली वाचवा- मुली शिकवा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा अभियान, महिला सक्षमीकरण, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार, न्यायदान आपल्या दारी, मतदान जनजागृती यासह विविध सामाजिक प्रश्नांवर व शासकीय योजनांवर शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे.

वारसा शाहिरी व लोककलेचा

आज अण्णा भाऊ साठे यांची जयंती. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव...’ या त्यांच्या गीतानुसार आजही त्यांचा शाहिरीचा वारसा जपला जात आहे. अनेक शाहीर व कलापथके समाजात सध्या चालत असलेल्या अनिष्ठ रुढी-परंपरा व अराजकतेविरुद्ध शाहिरीतून घाव घालत आहेत. अशाच शाहीर, लोककलावंत व कलापथकाचा अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त घेतलेला वेध.

शाहिरी कला प्रकारातून समाजासमोर ज्वलंत प्रश्न प्रभावीपणे मांडता येतात. सामाजिक सलोखा आणि राष्ट्रप्रेम जागरूक ठेवण्यासाठी शाहिरीची आजही नितांत आवश्‍यकता आहे. सत्य स्वीकारून यातील जाणकारांनी नव्या दमाने कंबर कसण्याची आवश्‍यकता आहे. निर्भिड व त्यागी भावनेने समाजात शूर रसांची बरसात करणाऱ्या शाहिरी पोवाड्यांची व कवनांची निर्मिती आवश्‍यक आहे.

- रमेश खाडे, शाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()