'सकाळ'च्या माध्यमातून अशा पिढी घडविणाऱ्या व प्रयोगशील शिक्षकांना प्रकाशात आणण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजे जिल्हा परिषद (ZP), महापालिका (Municipal Corporation), नगरपालिकेच्या (Nagarpalika) शाळेतील (School) एक शिक्षक काय किमया करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणून नक्षलग्रस्त अशा गडचिरोलीच्या (Gadchiroli) आदिवासी माडिया (Naxal-affected tribal Madiya) भागातील शिक्षकाची (Teacher) नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने मनस्वी आनंद झाला आहे. या शाळेत आयएएसच्या (IAS) प्रशिक्षणार्थींनी भेट देऊन त्या शिक्षकाकडून धडे घेतले, याचे खरे कौतुक वाटते. या शिक्षकाच्या तोडीचे शिक्षक सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कार्यकुशलतेने अतुलनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांची येथेही काही कमी नाही. 'सकाळ'च्या (Sakal) माध्यमातून अशा पिढी घडविणाऱ्या व प्रयोगशील शिक्षकांना प्रकाशात आणण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. (Appreciate the teachers who have made invaluable contributions even in adverse circumstances)
गडचिरोली जिल्ह्यातील 325 लोकसंख्येच्या कोयनगुडा गावात माडिया समाजातील आदिवासी राहतात. तेथे शाळेचा, शिक्षणाचा गंधही नसलेल्या लोकांसाठी विनीत पद्मावार (Vineet Padmawar) या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने अत्यंत सचोटीने आपल्या कार्यकुशलतेने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत पूर्वी केवळ 19 पटसंख्या होती, ती आता 35 वर गेली आहे. या शिक्षकाच्या धडपडीतून हे विद्यार्थी इंग्रजी, गणितात कुशलही झाले. आदिवासी, नक्षलग्रस्त भागातही असे 'टॅलेंट' (Talent) निर्माण करण्याचे काम हा शिक्षक करू शकतो, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी शाळेस भेट देऊन पाहणी केली. त्यांना आश्चर्यच वाटले. त्यांनी केलेल्या प्रयत्नातून या शाळेस भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थींना धडा घेण्यासाठी आमंत्रित करून ती भेट घडवून आणली.
कोयनगुडा पॅटर्नचे (Koyanguda Pattern) खरोखर कौतुकच आहे. अशा पद्धतीचे कार्य सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळा अन् महापालिकेच्या शाळेतही होत असल्याचे दिसते. महापालिकेच्या शाळेतील काही शिक्षकांनी तर स्वतःचे योगदान देत विद्यार्थ्यांना घरून आणण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था केली आहे. तर जिल्हा परिषदेतील काही शिक्षक कोरोना (Covid-19) काळातही शाळेचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल यासाठी टिपण काढून त्याच्या झेरॉक्स प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटण्याचे काम केले. यातून शिक्षणाची विद्यार्थ्यांमधील गोडी जराशीही कमी होऊ नये हीच काळजी घेतल्याचे दिसते. इंग्रजी धडे, पाठांतर, गणिताच्या (Mathematics) गमती-जमती, विविध उपक्रमांद्वारे गाणी, संगीताचेही धडे (Songs and Music) दिले. या उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक करताना मनस्वी आनंद होत आहे. मसुरी येथील आयएएस प्रशिक्षणार्थींना सोलापूरच्या 'ताटवाटी चाचणी'चे प्रशिक्षण देण्यात आले. गुणवत्तापूर्ण शाळांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ, जिल्ह्यातील पहिली सायकल बॅंक (Cycle Bank), चिल्ड्रन इनोव्हेशनमध्ये (Children's Innovation) राष्ट्रीय स्तरावर सहभाग, लॉकडाउन (Lochdown) काळात 'आविष्कार'च्या (Avishkar) माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग, स्वच्छ व सुंदर शाळा असे वेगवेगळे प्रयोग पाहून बदलत्या सकारात्मकतेचा प्रभाव वाढत असल्याचे दिसत आहे.
आत्मविश्वास दुणावला!
मध्यंतरीच्या काळात संगणकाचे संच बांधून फळकुट्यावर ठेवले गेले होते. त्यावर बरीच धूळ पडली होती. परंतु आता त्यात बदल झालेला दिसून येऊ लागलेला आहे. गेल्या काही वर्षात काही अपवाद वगळता संगणकीय शिक्षणाबरोबरच शाळेचा परिसर, इमारत, बाकडे, फळा, रंगविलेल्या भिंती, कंपाउंड असे सारे काही चांगले चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचीही उदाहरणे दिसू लागली आहेत. अलीकडील काळातील स्पर्धा परीक्षेचा निकाल पाहिला तर सोलापूर शहरापेक्षा जिल्ह्यातील म्हणजे ग्रामीण भागातील टक्का चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. या यशासाठीही या शिक्षकांना धन्यवाद दिले पाहिजेत.
नोंद घेण्यासारखे...
स्पर्धा परीक्षेत (Competitive Examinations) वाढलेला ग्रामीण टक्का
ग्रामीण शिक्षणाचे बदललेले रूपडे
मसुरी येथील आयएएसच्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन
राज्यभर गाजतोय सोलापूर पॅटर्न
कोरोना काळातही शिक्षणाची गोडी कायम
वाढत्या लोकसहभागाची शासन दरबारी नोंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.