सोलापूर - श्रावण महिन्याच्या शिवपूजन परंपरेत रुद्राक्ष हे शिवाचे प्रतीक मानले जाते. प्राचीनकाळापासून आध्यात्मिक मणी अशी त्याची ओळख आहे. रुद्राक्ष हे एक फळाचे बीज आहे. रुद्राक्षाची झाडे नेपाळ प्रदेशात अधिक प्रमाणात सापडले जातात.
शिवपूजनात रुद्राक्षाचे महत्त्व सर्वाधिक मानले जाते. प्रत्यक्ष शिवस्वरुपात रुद्राक्षाचे पूजन केले जाते. तसेच अंगावर विविध प्रकारात धारण केला जातो. रुद्राक्षाची माळदेखील घालण्याची परंपरा आहे.
आख्यायिका
रुद्राक्ष म्हणजे रुद्रांचा अर्थात शंकरांचा अक्ष. म्हणजे भगवान शंकरांचे डोळे. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूतून झाली असे मानले जाते.कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून जमिनीवर पडलेल्या अश्रूंमधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली.
ठळक बाबी
- शिवमहापुराण, श्री गुरुचरित्रामध्ये रुद्राक्षाला प्रत्यक्ष शिव स्वरूप रूप मानले गेले आहे.
- रुद्राक्ष ही आध्यात्मिक ऊर्जा देणारे फळ आहे
- रुद्राक्ष मनाला शीतलता, शांतता आणि स्थैर्य प्रदान करतो.
- अंतर्मनाला ऊर्जा देणारा, सदैव पित्ताला शांत ठेवणारा आणि शरीर व मनाचा समतोल ठेवण्यासाठी अत्यंत लाभदायी
- रुद्राक्ष वैवाहिक आयुष्यात आनंद, प्रेम आणि सुखाची प्राप्ती करून देतो.
- मानसन्मान, वाणी प्रभुत्वासाठी उपयुक्त
- एक मुखीपासून ते १४ मुखीपर्यंतचे रुद्राक्ष उपलब्ध असतात.
रुद्राक्ष धारण कधी करावा?
पौर्णिमा, अमावस्या किंवा सोमवारी रुद्राक्ष धारण करणे श्रेष्ठ मानले जाते. श्रावण महिन्यात रुद्राक्ष कोणत्याही दिवशी परिधान केले जाऊ शकते. कारण श्रावण महिन्यातील सगळेच दिवस शुभ असतात. रुद्राक्ष १,२७,५४ आणि १०८ संख्येनुसार धारण करावे. रुद्राक्ष परिधान केल्यानंतर सात्विकतेचे पालन करावे. रुद्राक्षाला एखाद्या धातूसोबत परिधान करण्याने अधिक चांगले लाभ मिळतात.
रुद्राक्ष धारण केल्यानंतरचे आध्यात्मिक नियम
- अंत्यसंस्कार कार्यक्रमात रुद्राक्ष घालून जाऊ नये.
- रुद्राक्षाला अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नये.
- रात्री झोपताना रुद्राक्ष काढून ठेवावा.
- रुद्राक्षाची माळ नेहमी आंघोळीनंतरच घालावी.
- रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा.
- रुद्राक्ष काळ्या धाग्यात कधीही घालू नये.
- रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांसाहार टाळावा.
रुद्राक्ष हा शिवाचे प्रतीक आहे. त्याच्या पूजनाने शिवाचे पूजन होते. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सर्वाकडे पाहण्याची समदृष्टी प्राप्त होते. तसेच आरोग्यदृष्ट्या रुद्राक्ष हा रक्तदाब व ह्रदयरुग्णांसाठी उपयुक्त ठरतो.
- प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी, अध्यात्मिक अभ्यासक, सन्मित्रनगर, शेळगी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.