Solapur : माळशिरस तालुक्यातून अरुण थिटे ईश्वर चिठ्ठीत विजयी ; लेबर फेडरेशन निवडणूक निकाल

सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या संचालक मंडळातील आठ जागांसाठी आज मतदान व मतमोजणी झाली.
Solapur
Solapur sakal
Updated on

सोलापूर : सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या संचालक मंडळातील आठ जागांसाठी आज मतदान व मतमोजणी झाली. माळशिरस तालुक्यातून सत्ताधारी गटाचे अरुण थिटे ईश्वर चिठ्ठीवर विजयी झाले आहेत. फेडरेशनच्या सर्वच्या सर्व जागांवर सत्ताधारी गटाला एक हाती विजय मिळाला आहे.

माळशिरस तालुक्यातील सर्वसाधारण मतदारसंघातून अरुण थिटे व नितीन शिंदे यांना समसमान १३ मते पडली. त्यानंतर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीतून ते विजयी झाले. माढा तालुक्यातील सर्वसाधारण मतदारसंघातून यशवंत शिंदे यांना २१ तर प्रियदर्शन साठे यांना १९ मते मिळाली. या मतदारसंघातून यशवंत शिंदे दोन मतांनी विजयी झाले आहेत. पंढरपूर तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून बाळासाहेब बागल यांना २२, रेश्मा साठे यांना १६ तर पुनम कौलगे पाटील यांना दोन मते मिळाली. या मतदारसंघातून बाळासाहेब बागल विजयी झाले. सांगोला मतदार संघातून लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब करांडे दणदणीत विजयी झाले आहेत. त्यांना २३ मते मिळाली आहेत. त्यांचे विरोधक अंकुश शेडगे यांना ९ मते मिळाली आहेत.

महिला राखीव मतदार संघातील दोन जागांवर पार्वती गाडे व सरस्वती साठे विजयी झाल्या आहेत. गाडे यांना २६७ तर साठे यांना २५४ मते मिळाले आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार पूनम कौलगे पाटील यांना ९२, रेश्मा साठे यांना ७३ मते मिळाली आहेत. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून लक्ष्मण मस्के विजयी झाले आहेत.

Solapur
Maratha Reservation : मराठा आंदोलनाची आठवड्यात पुढची दिशा ; आरक्षण लढाई

मस्के यांना २९९ तर रमेश वाघमारे यांना ८२ मते मिळाली आहेत. इतर मागासवर्गीय मतदार संघातून वसंत क्षीरसागर विजयी झाले असून त्यांना २९६ मते मिळाली आहेत. त्यांचे विरोधक सदानंद फुले यांना ८६ मते मिळाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटातील संचालकांनी जल्लोष केला.

आमच्या संचालक मंडळाने केलेल्या कार्याची ही पोचपावती आहे. फेडरेशनला व फेडरेशनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या मजूर सहकारी संस्थांना भक्कम करण्यासाठी यापुढेही कार्यरत राहणार. कामाला परमेश्‍वर समजल्यानंतर निवडणुकीत पराभवाची भीती राहात नाही.

- बाबासाहेब करांडे, चेअरमन, लेबर फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.