इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! 12 दिवसांत तब्बल 9 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन

आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) पूर्वी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
Vitthal-Rukmini Temple
Vitthal-Rukmini Templeesakal
Updated on
Summary

द्वादशी म्हणजे 18 जुलैपर्यंत तब्बल 9 लाख 62 हजार भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने गेल्या 12 दिवसांमध्ये तब्बल 9 लाख 62 हजार भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणीचे (Vitthal- Rukmini Temple) दर्शन घेतले आहे. तशी नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. आज पर्यंतच्या इतिहासात फक्त 12 दिवसांमध्ये दर्शनाची विक्रमी नोंद झाली आहे‌.

यंदा आषाढी यात्रेसाठी विक्रमी गर्दी झाली होती. दरम्यान, आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) पूर्वी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 7 जुलै पासून विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन‌ सुरू करण्यात आले आहे. 14 जुलैपर्यंत सुमारे सात लाख भाविकांनी मुख आणि पदस्पर्श दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.

Vitthal-Rukmini Temple
'नकली वाघांना शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं महत्त्व काय समजणार'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

तर, द्वादशी म्हणजे 18 जुलैपर्यंत तब्बल 9 लाख 62 हजार भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक दर्शनाची नोंद आषाढी एकादशीच्या दिवशी झाली आहे. या दिवशी सुमारे 50 हजार भाविकांनी पदस्पर्श, तर 30 हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले.

Vitthal-Rukmini Temple
विशाळगडावर आम्ही हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतो, पण..; मुश्रीफांना दंगलीची माहिती देताना मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर

6 ते 18 जुलै या बारा दिवसांमध्ये 9 लाख 62 हजार भाविकांनी दर्शन‌ घेतले आहे. आज पर्यंतची दर्शनाची ही सर्वाधिक नोंद झाली आहे. व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर दर्शनाचा वेग वाढल्याने वारीसाठी आलेल्या जास्तीत-जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.