Ashadhi Wari 2023 : अवघे गर्जे पंढरपुर, पंढरीत दहा ते बारा लाख भाविकांची मांदियाळी

एकादशी दिवशी मानाच्या संतांच्या पालख्यांसह श्रीसंत ज्ञानेश्‍वर, श्रीसंत तुकाराम यांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालून नगरप्रदक्षिणा केली.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 sakal
Updated on

Ashadhi Wari 2023 - आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या उत्साहाने दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज चंद्रभागा नदीमध्ये एकादशीच्या पवित्र स्नानाची पर्वणी साधली.

तदनंतर नगर प्रदक्षिणेला निघालेल्या मानाच्या पालख्यांच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या विठू नामाच्या जय घोषाने व टाळ, मृदुंगाच्या निनादाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. श्री विठ्ठलाच्या पददर्शनाला आज पहाटे १५ ते १८ तास लागत होते.

Ashadhi Wari 2023
Mumbai : आयपीएल पोलीस बंदोबस्ताला बंपर सुट! 70 लाखांऐवजी फक्त 10 लाख शुल्क

अवघा रंग एक झाला! रंगि रंगला श्रीरंग! मी तूंपण गेले वाया!पाहता पंढरीच्या राया! आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठलाच्या दर्शनाने तृप्त झालेल्या लाखो वारकऱ्यांची अवस्था अशी झाली होती.

Ashadhi Wari 2023
Mumbai Local : भरधाव लोकलमध्ये मुंबईकरांना लटकत करावा लागतोय प्रवास; थरारक Video Viral

आज एकादशी दिवशी मानाच्या संतांच्या पालख्यांसह श्रीसंत ज्ञानेश्‍वर, श्रीसंत तुकाराम यांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालून नगरप्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा घालत असताना दिंडीतील वारकऱ्यांच्या "ज्ञानोबा माऊली तुकाराम" जयघोषाने व अभंग व टाळ, मृदुंगाच्या गजराने पंढरीतील वातावरण भक्तीमय झाले होते. मागील वर्षी आषाढी यात्रेच्या दरम्यान पाऊस पडल्यामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले होते.

बहुतांश भाविक द्वादशीलाच माघारी फिरले होते. आज एकादशीच्या ऐन दुपारी पावसात सुरुवात झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली. पाऊस जोर धरतोय असे वाटत असतानाच काही काळानंतर पाऊस पडायचा थांबला. त्यामुळे लाखो भाविकांना आषाढी यात्रेच्या सोहळा मनसोक्त अनुभवता आला.

Ashadhi Wari 2023
Mumbai Crime : ज्वेलर्सचे दुकान फोडायला आले अन् मार खाऊन जेलमध्ये गेले! डोंबिवलीत चोरीचा प्रयत्न फसला

दरम्यान आज पहाटे श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग रिद्धी सिद्धी मंदिराच्या पुढे गेली होती. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले श्री किसन अवघड (रा.शेवते, ता.व जि.जालना)' सकाळ 'शी बोलताना म्हणाले, बुधवारी दुपारी दोन वाजता दर्शन रांगेत उभे राहिलो होतो.गुरुवारी पहाटे चार वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, महाद्वार, चौफाळा आदी महत्त्वाच्या ठिकाणी रस्सी पॉईंटच्या माध्यमातून भाविकांच्या अलोट गर्दीचे नियंत्रण करण्यात आले होते.

Ashadhi Wari 2023
Mumbai Crime : ज्वेलर्सचे दुकान फोडायला आले अन् मार खाऊन जेलमध्ये गेले! डोंबिवलीत चोरीचा प्रयत्न फसला

याशिवाय शहर व परिसरात लावण्यात आलेल्या सुमारे तीनशे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आषाढी यात्रेच्या गर्दीवर वॉच ठेवण्यात आला आहे. तर यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल, राखीव दल अशा सुमारे सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान दरवर्षीप्रमाणे आज आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची रथयात्रा प्रदक्षिणा मार्गावरील माहेश्वरी धर्मशाळेपासून निघाली होती. रथाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Ashadhi Wari 2023
Pune : नाणेघाटाजवळील ब्रिटिश कालीन फडके बंधारा तुडुंब

परगावच्या विक्रेत्यांचे सर्वत्र अतिक्रमण: ऐन आषाढी दशमी,एकादशीला होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमध्ये पंढरपूर नगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाची वाहने येऊ शकत नाहीत याचा गैरफायदा घेत परगावच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. स्टेशन रोड चौफाळा व मंदिर परिसर वगळता प्रदक्षिणा रोड, भक्ती मार्ग, संत पेठ, शिवाजी चौक ते पंढरपूर अर्बन बँक रस्त्यासह शहरातील सर्वच उपरस्त्यांवर या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे यात्रेला आलेल्या भाविकांना पंढरीत संचार करणे जिकिरीचे झाले होते.

Ashadhi Wari 2023
Mumbai : आयपीएल पोलीस बंदोबस्ताला बंपर सुट! 70 लाखांऐवजी फक्त 10 लाख शुल्क

एकादशीला भाविकांना फराळाचे वाटप: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, जमखंडी येथील दानेश्वर महाराज, जळगाव जिल्हा सेवा समिती, क्रेडाई पंढरपूर यासह विविध सामाजिक संस्था व संघटना यांच्यावतीने हजारो भाविकांना साबुदाणा खिचडी, केळी व उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.

पंढरीतील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी: पंढरपूर शहरातील रेल्वे पुलाखालील दोन्ही बोगदे, सरगम चौक, टाकळी रेल्वे बोगदा, पद्मावती उद्यानासमोरील रस्ता, तुळशी वृंदावनकडे जाणारा रस्ता, बायपास रस्ता यासह प्रमुख चौकामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. शहराच्या उपनगरातील सर्वच रस्त्याच्या दोन्ही बाजूला यात्रेला आलेल्या भाविकांनी आपले ट्रक व इतर वाहने पार्क केली होती.

त्यामुळे वाहतूक कोंडी मध्ये आणखी भर पडल्याने भाविकांना प्रचंड मनस्ताप झाला. शहरातील अरुंद रस्त्यांवर एकाच वेळी शेकडो वाहने आल्याने वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांची देखील दमछाक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.