Solapur - आषाढी वारी व सोलापूर शहरासाठी उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे सिद्धापूर -वडापूर बंधाऱ्यातील दारे काढल्याने सध्या एक मीटर इतकेच पाणीसाठा शिल्लक ठेवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यामुळे या परिसरातील हजारो हेक्टर खालील बागायत शेती भविष्यात अडचणीत येणार आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे उजनीतील पाणीसाठा कमी झाला आहे. उपलब्ध असलेले पाणी सध्या उजनी वर अवलंबून असलेल्या पुणे जिल्ह्यातील पाणी वापर संस्था, औद्योगिक वसाहत,जिल्ह्यातील शेती, सोलापूरसाठी पिण्याचे पाणी आधी परिस्थिती पाहता सध्या उजनी धरण मायनस 30 टक्के मायनस मध्ये आहे सध्या सोडलेल्या पाण्यामुळे ते 45% पर्यंत मायनस मध्ये जाऊ शकते.सध्या पावसाने ओढ दिली आहे.
असून अद्याप समाधानकारक पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे भविष्यात हे धरण आणखीन मायनस मध्ये गेल्यास सध्या जिल्ह्यातील भीमा नदीकाठीच्या शेतीसह पिण्याच्या पाण्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे.पावसाच्या ओढीमुळे जनावरासाठी चारा म्हणून सध्या उसाचा वापर केला जात आहे त्याचा परिणाम जिल्ह्यातील खाजगी,सहकारी साखर कारखान्याच्या गाळपावर होणार आहे.
सिद्धापूर बंधाऱ्यामुळे लगतच्या हजारो हेक्टर बागायत शेतीमुळे जवळपास 11 ते 12 साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला जातो सध्या पंढरपूर व सोलापूर साठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे या बंधाऱ्यांमध्ये एक मीटर इतकेच पाणीसाठा ठेवण्याच्या दृष्टीने बंधाऱ्यांमधील दारे काढून ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाणीसाठा कमी होणार आहे.
त्यामुळे या भागातील हजारो एकर बागायत शेती भविष्यात ओसाड होणार आहे याचा फटका शेतीबरोबर कारखानदारीला बसणार आहे शिवाय शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई शासन देणार नाही उलट त्यांना कर्जबाजारी व्हावी लागणार आहे.
त्यासाठी शासनाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे परंतु या प्रकाराकडे सोयीस्कर त्या दुर्लक्ष करून या भागातील बागायत शेती अडचणीत आणण्याचा प्रयत्न सध्या शासनाकडून सुरू आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
या भागातील शेती व शेतीवर अवलंबून असणारे उद्योग टिकवण्याच्या दृष्टीने शासनाने बंधाऱ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा ठेवणे आवश्यक आहे मात्र या बंधाऱ्याचे दारे काढून शासन या भागातील शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये.
अनिल बिराजदार संघटक स्वाभिमानी शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.