पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त वारकरी भाविकांच्या सोयीसाठी पंढरपुरात तीन दिवस आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमातून भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिली.
महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे सोमवारी (ता. २४) आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थित बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्य आरोग्य शिक्षणचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे,
मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सां. बां. कार्यकारी अभियंता अमित निंबकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले व वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके यासह राज्यातील ऑनलाईनद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते
मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तत्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे वाखरी व तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.
तसेच गोपाळपूर व ६५ एकर येथे ५० खाटांचे तात्पुरते सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, भाविकांची आरोग्य तपासणी करून तत्काळ उपचार करण्यात येणार आहेत.
पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आरोग्य विभागाकडून मुबलक औषध पुरवठा, पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था,
व्यक्ती यांच्याकडून दिंड्यांतील वारकरी भाविकांना अन्नदान व फळ वाटप केले जाते. वाटपकरण्यात अन्नाची व फळांची तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी महाआरोग्य शिबिरासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.
पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंड्यांच्या प्रत्येक मार्गावर आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने तसेच खासगी हॉस्पिटल २४ तास सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी.
नदीपात्रात नळ कनेक्शनची संख्या वाढवावी. स्वच्छतेसाठी ज्यादाचे कर्मचाऱ्यांची उपलब्धता ठेवावी.
वाळवंटात कचरा साठवण्यासाठी पत्र्याच्या पानांचे १०० ते २०० मीटरला तात्पुरत्या कचरा कुंड्या कराव्यात
वाळवंटात बाईक रुग्णवाहिकेची उपलब्धता ठेवावी, जेणेकरून भाविकांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होतील
पोलिस प्रशासनाने वारी कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी
नगरपालिका विभागाने आरोग्य शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता व पाण्याचा पुरवठा
सार्वजनिक बांधकाम विभागाने शिबिराच्या ठिकाणी मुरमीकरण करावे, पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.