Ashadhi Wari : आषाढी वारीनंतर संत-देव भेटीचा विठ्ठल मंदिरात रंगला सोहळा; दोन हजार वारकऱ्यांना दिले VIP दर्शन

Ashadhi Wari Vitthal Temple : आज गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काल्याचा उत्सव पार पडला.
Ashadhi Wari Vitthal Temple Pandharpur Palkhi Sohala
Ashadhi Wari Vitthal Temple Pandharpur Palkhi Sohalaesakal
Updated on
Summary

आज गोपाळ काल्यानंतर सर्व मानाच्या पालख्यातील वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला होता.

पंढरपूर : भेटी लागे जीवा, लागलीस आस.. पाहे रात्रंदिवस वाट तुझी... याच उत्कट भावनेने लाखो भाविक आषाढीवारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत आले होते. आषाढी वारीचा (Ashadhi Wari) अनुपम्य सोहळा पार पडल्यानंतर रविवारी (ता. 21) प्रत्यक्ष संत आणि देव यांच्यातील गळा भेटीचा अनुपम्य सोहळा विठ्ठल मंदिरात (Vitthal Temple Pandharpur) भक्तीमय वातावारणात मोठ्या उत्साहात रंगला. यावेळी शेकडो भाविकांनी विठुनामाचा जयघोष केला.

आज गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काल्याचा उत्सव पार पडला. त्यानंतर सर्व मानाच्या पालख्या विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. सकाळी निळोबाराय, मुक्ताबाई यांच्या पालख्या मंदिरात आल्या होत्या. मंदिरात आलेल्या संतांच्या पादुका विठुरायाच्या चरणावर ठेवून पादुकांचे पूजन केले. दुपारी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका मंदिरात आणल्या.

Ashadhi Wari Vitthal Temple Pandharpur Palkhi Sohala
उद्या गडावर जाऊन, कोणीही फाईव्हस्टार हॉटेल बांधेल; विशाळगडावरुन उदयनराजेंचा अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा

यावेळी मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सातही मान्याच्या पालख्यातील मानकऱ्यांना श्रीफळ आणि विठुरायाचा प्रसाद भेट देवून त्यांचा सत्कार केला. मानाच्या पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांनी विठ्ठल मंदिरातील सभा मंडपात विठ्ठल नामाचा एकच जयघोष केला.

Ashadhi Wari Vitthal Temple Pandharpur Palkhi Sohala
Para Olympic च्या आखाड्यात माणदेशातील दोन रत्ने; गोळाफेकीत सचिन खिलारी, तर बॅडमिंटनमध्ये सुकांत कदम सहभागी होणार

दोन हजार वारकऱ्यांना व्हीआयपी दर्शन

आज गोपाळ काल्यानंतर सर्व मानाच्या पालख्यातील वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला होता. दुपारपर्यंत सर्व मानाच्या पालख्यातील जवळपास दोन हजार वारकऱ्यांना व्हीआयपी दर्शन देण्यात आले. विठ्ठल दर्शनासाठी पालख्यातील वारकऱ्यांची गर्दी वाढल्याने जवळपास चार ते पाच तासाहून अधिक वेळ दर्शन रांग थांबवण्यात आली होती. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना थांबवून पालख्यातील वारकऱ्यांना व्हीआयपी दर्शन देणे ही बाब अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अरुण महाराज बुरघाटे यांनी दिली आहे.

विविध संतांच्या पादुका विठ्ठलाच्या चरणावर ठेवून पूजा केली जाते. ही परंपरा अलीकडेच मंदिर समितीने सुरु केली आहे. ही एक चांगली परंपरा आहे. संत आणि देव यांच्यातील भेटीमुळे भाविक सुखावून जातात. आषाढी वारीसाठी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात येतात. यामध्ये मानाच्या दहा पालख्यांना मंदिरात पादुका दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. यावेळी संत आणि देव यांची भेट घडवून आणली जाते. त्यानंतर पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात.

-प्रकाश महाराज जवंजाळ, सदस्य विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.