Ashadi Ekadashi: वारकऱ्यांसाठी भक्ती सागर सज्ज, तीन लाख जणांची होणार आरोग्य तपासणी

Pandharpur Wari : पार्श्वभूमीवर प्रशासनाने ६५ एकर परिसरात जय्यत तयारी केली आहे.
Ashadi Ekadashi: वारकऱ्यांसाठी भक्ती सागर सज्ज, तीन लाख जाणांची होणार आरोग्य तपासणी
Ashadi Ekadashisakal
Updated on

(राजकुमार घाडगे- सकाळ वृत्तसेवा)

Latest Solapur Update आषाढी यात्रेला येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने ६५ एकर (भक्ती सागर) परिसरामध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी तेथे ४९७ प्लॉटस उपलब्ध असून शुक्रवारी (ता.१२) सायंकाळपर्यंत त्यापैकी २५४ प्लॉटसचे वाटप करण्यात आले आहे.

यात्रा कालावधीमध्ये येथे मुक्कामी असणाऱ्या सुमारे अडीच ते तीन लाख वारकऱ्यांचे आरोग्य तपासण्यासाठी यंदा प्रथमच 'पंढरीच्या दारी- आरोग्याची वारी' या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Ashadi Ekadashi: वारकऱ्यांसाठी भक्ती सागर सज्ज, तीन लाख जाणांची होणार आरोग्य तपासणी
Ashadi Ekadashi 2023 : दुमदुमली पंढरी; चंद्रभागेला भक्तीचा महापूर, भाविकांची मांदियाळी

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी दरवर्षीपेक्षा यंदा विक्रमी संख्येने भाविकांचे पंढरीमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ६५ एकर परिसरात जय्यत तयारी केली आहे.

आषाढी यात्रा कालावधी मध्ये मुक्कामासाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना प्रशासनाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ६५ एकर मध्ये सुमारे १४३५ स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, २४ तास वीजपुरवठा, ३ ठिकाणी दिंडीतील पाण्याचा टँकर भरण्याची सोय, महिला वारकऱ्यांसाठी स्नानाची सोय आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांना मुक्काम करण्यासाठी ६५ एकर मध्ये एकूण ४९७ प्लॉटस उपलब्ध असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाकडे दिंडीकऱ्यांचे २९३ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २५८ प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच या परिसरातील ११० गुंठे खुली जागा देखील दिंडीकऱ्याना उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा प्रथमच ६५ एकर परिसरामध्ये मुख्याध्यापक सुमारे अडीच ते तीन लाख वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी पांडुरंगाच्या दारी आरोग्याची वारी हे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारा मोठा पेंडाल उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Ashadi Ekadashi: वारकऱ्यांसाठी भक्ती सागर सज्ज, तीन लाख जाणांची होणार आरोग्य तपासणी
Ashadi Ekadashi 2023 : प्रतिपंढरपूर वैष्णव गडावर विठ्ठल रुक्माईचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

दरम्यान आषाढी यात्रेसाठी विदर्भ मराठवाड्यातून निघालेल्या दिंड्यांचे आगमन झाल्याने वारकऱ्यांच्या गर्दीने ६५ एकर परिसर फुलू लागला आहे. येथील आपत्कालीन मदत केंद्रामध्ये वारकऱ्यांच्या सहाय्यतेसाठी मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, मंडल अधिकारी बिभीषण वागज, तलाठी प्रमोद खंडागळे, दादासाहेब पाटोळे यांची टीम कार्यरत आहे.

६५ एकर मधील उपलब्ध सुविधा:

वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन, दिंडीतील वारकऱ्यांच्या निवासासाठी ४९७ प्लॉटसह ११० गुंठे खुली जागा, तब्बल १४३५ स्वच्छतागृहे, आपत्कालीन मदत केंद्र, २४ तास वीज व पाणीपुरवठा, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वॉच टॉवर, महिला वारकऱ्यांसाठी स्नानगृहे

६५ एकर परिसरामधील प्रशासनाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी देखील वारकऱ्यांना काही अडचण आल्यास अथवा कोणतीही मदत हवी असल्यास आपत्कालीन मदत केंद्रातील अधिकारी वा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

- सचिन मुळीक, तहसीलदार,आपत्कालीन मदत केंद्रप्रमुख, भक्ती सागर

Ashadi Ekadashi: वारकऱ्यांसाठी भक्ती सागर सज्ज, तीन लाख जाणांची होणार आरोग्य तपासणी
Ashadi Ekadashi 2023 : अनुभवाची वारी...चुकू न दे हरी...हेचि मागणे तुझ्या दारी.. पांडुरंगा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.