Ashadi Wari: संभाजी महाराज मस्के ३० वर्षांपासून जोपासताहेत समतेच्या वारीची परंपरा; निर्भेळ आनंदाचा सोहळा

Asadhi Ekadashi Latest News: साक्षात पांडुरंगच चालतो तुमच्या सोबत, मग काळजी कशाची?
Ashadi Wari: संभाजी महाराज मस्के ३० वर्षांपासून जोपासताहेत समतेच्या वारीची परंपरा; निर्भेळ आनंदाचा सोहळा
Ashadi Wari:sakal
Updated on

Hingoli Pandharpur Latest Update: समतेची शिकवण आणि अंगीकार करणारी ही वारी असल्याचे प्रतिपादन दुधाळा येथील संभाजी महाराज मस्के यांनी केले. तीस वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंडीत ते सहभागी होत आहेत.

महाराजांना वारीत जाण्याची प्रेरणा सदानंद महाराज यांच्याकडून मिळाली. ती अंखडित असल्याचे ते म्हणाले. वारीची एक अलौकिक ओढ असते. घर-दार, पोरं-बाळं, सुखाचा संसार, भौतिक गोष्टींचा त्याग करून वारकरी पायी पंढरीला निघतात.

Ashadi Wari: संभाजी महाराज मस्के ३० वर्षांपासून जोपासताहेत समतेच्या वारीची परंपरा; निर्भेळ आनंदाचा सोहळा
Ashadi Wari: शेवटच्या मुक्कामासाठी वाखरीत असणार तब्बल १२ लाख भाविक

वारकऱ्‍यांसमवेत विठू माउलीही चालत असते. सर्वांची काळजी घेण्यासाठी विठुराया दिंडीत असतात. वाटेत येणारे सगळे अनुभव स्वीकारून, सर्व परिस्थितीत आनंद मानून वारकरी फक्त दर्शनाच्या ओढीनं, टाळ आणि नामजपाचा जयघोष करत चालत असतात.

१८ दिवस चालून आषाढी एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लागलेली उत्कंठा, देहभान हरपून वारीमध्ये चालणारे व नाचणारे वारकरी, विविध ठिकाणी होणारी रिंगणे आणि दैनंदिन आयुष्यापासून काही दिवस दूर होऊन दिंडीतून मिळणारे आध्यात्मिक समाधान, यातून जीवनाचे सार्थक सांगणारी वारी ही संकल्पना मानवी जीवनाच्या उद्धारासाठी प्रेरणादायी आहे.

पंढरीची ही वारी म्हणजे पृथ्वीवरील एक अभूतपूर्व सोहळाच. कोणतेही निमंत्रण नसताना लाखोंच्या संख्येने एकत्र येत हरिनामाच्या गजरात गुण्यागोविंदाने वारकऱ्यांचा हा लवाजमा चालत असतो.

Ashadi Wari: संभाजी महाराज मस्के ३० वर्षांपासून जोपासताहेत समतेच्या वारीची परंपरा; निर्भेळ आनंदाचा सोहळा
Ashadi Wari: आषाढी यात्रेला आलेल्या मानाचा पालख्यांच्या स्वागतासाठी वाखरी पालखीतळ सज्ज

एकत्र येणारा विश्वातील अनोखा मेळावा

मतभेद विसरून सर्वांच्या भल्यासाठी एकत्र येणारा हा जनसमुदाय म्हणजे विश्वातील एक अनोखा मेळावाच आहे. संत वचनानुसार वारी ही स्त्री-पुरुष, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत यांसारख्या भेदांच्या पलीकडील असून, समतेची शिकवण आणि अंगीकार करणारी ही वारी आहे. समस्त भाविक लौकिक जीवनातील ओळख विसरून फक्त वारकरी म्हणून वारीमध्ये सहभागी होतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालणे, देहभान हरपून नाचणे, फुगड्या खेळणे; तसेच एकत्र भोजन, सायंकाळी भजन आणि कीर्तन यामधून मिळणारा निर्भेळ असा आनंद वारीमधून मिळत असतो.

Ashadi Wari: संभाजी महाराज मस्के ३० वर्षांपासून जोपासताहेत समतेच्या वारीची परंपरा; निर्भेळ आनंदाचा सोहळा
Ashadi Ekadashi 2023 : दुमदुमली पंढरी; चंद्रभागेला भक्तीचा महापूर, भाविकांची मांदियाळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.