Mohol News : अखेर आष्टी उपसा सिंचन योजनेला मंत्रीमंडळाने दिली सुधारीत प्रस्तावास मान्यता, 396 कोटीचा निधी मंजुर

मोहोळ तालुक्यातील दहा गावाच्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती करणाऱ्या अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर सुधारित प्रस्तावास मान्यता मिळाली.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

मोहोळ - मोहोळ तालुक्यातील दहा गावाच्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती करणाऱ्या अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर सुधारित प्रस्तावास मान्यता मिळाली असून, यासाठी एकूण 395 कोटी 48 लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, अनगर व परिसरातील गावांना कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. वेळप्रसंगी पावसाळ्यात ही या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, शेतीचा प्रश्न तर लांबच. जवळून कुठूनही जलवाहिन्या टाकून पाणी आणण्याची सोय नाही.

यावर पर्याय म्हणून माजी आमदार पाटील यांनी अनगर व दहा गावे उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव तयार करून तो शासन दरबारी मंजुरीसाठी दाखल केला. हा प्रस्ताव शासकीय प्रक्रिया पूर्ण करीत एसएलटीसी या महत्त्वाच्या विभागात दाखल झाला. या ठिकाणी त्याची तपासणी होऊन या योजनेचे त्या ठिकाणी आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन असे नामकरण करण्यात आले.

या सिंचन योजनेमुळे 18 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हे पाणी आष्टी तलावातून उचलून ते देवडीच्या माळरानावर आणले जाणार आहे. त्या ठिकाणी मुख्य चेंबर असणार आहे. त्या ठिकाणावरून प्रत्येक गावाच्या क्षेत्रानुसार वॉल्वद्वारे पाणी वितरीत होणार आहे.

योजनेचे काम सुरू झाल्या पासून दोन वर्षात ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. योजना कार्यान्वीत झाल्यानंतर तालुक्यात फळबागा सह उसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढीस लागणार आहे. दरम्यान या योजनेचा प्रस्ताव लवकर दाखल करा अशी सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागाला दिली होती.

या गावांना होणार फायदा -

देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाचीवाडी, चिखली व अनगर. दरम्यान उपसा सिंचन योजना मंजुर झाल्याने माजी आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.