Solapur : विधानसभेच्या काही जागावर शिक्षकांना संधी द्यावी; शिक्षक समितीची मागणी

आगामी विधानसभा निवडणूकांत देखील शिक्षकांना काही मतदारसंघात संधी देता येईल का याचाही विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली.
assembly election 2024 demand to contest teachers this time politics
assembly election 2024 demand to contest teachers this time politicssakal
Updated on

मंगळवेढा : आगामी विधानसभा निवडणूकांत देखील शिक्षकांना काही मतदारसंघात संधी देता येईल का याचाही विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.पवार यांची आज मोदीबाग , पुणे येथे भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर , माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील , राज्य उपाध्यक्ष आनंदराव कांदळकर ,

सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार , किरण गायकवाड , केदू देशमाने , सांगली शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शशी भागवत , शशिकांत बजबळे,सोलापूर जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर,नाशिकचे जिल्हा नेते जिभाऊ बच्छाव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

assembly election 2024 demand to contest teachers this time politics
Solapur Rain Update : पावसाळ्यात सोलापूरच्या प्रत्येक चौकातील कानाकोपऱ्यात मक्याच्या कणसांची विक्री जोरात

शिक्षकांच्या प्रश्नांवर सुमारे वीस मिनिटे झालेल्या चर्चेत शिक्षक समितीची राज्यात असलेली संघटनात्मक ताकद , शिक्षक समिती राज्याध्यक्षांवर राजकीय आकसबुद्धीने झालेली प्रशासकीय कारवाई बाबतीत तपशीलवार चर्चा झाली.

तसेच दि. 15 मार्च 2024 चा संच मान्यतेच्या संबंधी निघालेला शासन निर्णय रद्द व्हावा , विद्यार्थी गणवेश योजना शाळा व्यवस्थापन समितीकडे पूर्ववत ठेवावी , जुनी पेन्शन योजना सद्यस्थीतीत सुरु असलेली आंदोलने , जुन्या पेन्शनसाठी विकल्प भरुन घ्यावेत , महाराष्ट्रातील रिक्त शिक्षकपदे व अधिकारी पदे ,

assembly election 2024 demand to contest teachers this time politics
Raj Thackeray Solapur: राज ठाकरेंचा दौरा; मनसे सोलापुरात उमेदवार उभा करणार?

आश्वासित प्रगती योजना इत्यादी शिवाय खा. भास्करराव भगरे यांच्या रुपाने एका सामान्य शिक्षकाला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल खा. पवारांचे ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी खा.पवार साहेब यांनी प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या समवेत लवकरच चर्चा करुन शिक्षकांना विधानसभेसाठीच्या काही जागा देता येतील का याबाबत निर्णय घेऊ तसेच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आगामी काळात ठोस धोरण आखणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.