नगरपंचायतीच्या निवडणुकीला 'त्या' आदेशाची धाकधूक!
नगरपंचायतीच्या निवडणुकीला 'त्या' आदेशाची धाकधूक!esakal

नगरपंचायतीच्या निवडणुकीला 'त्या' आदेशाची धाकधूक!

नगरपंचायतीच्या निवडणुकीला 'त्या' आदेशाची धाकधूक!
Published on
Summary

सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat) सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. ओबीसी (OBC) जागांवरील निवडणूक स्थगित करून उर्वरित जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) फेटाळत स्थगित ठेवलेल्या जागांचीही निवडणूक खुल्या जागांच्या माध्यमातून घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) अद्यापपर्यंत कोणताही आदेश काढला नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकांना त्या आदेशाची धाकधूक कायम असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात झाले आहे. (Attention to the role of the Election Commission in the context of OBC reservation)

नगरपंचायतीच्या निवडणुकीला 'त्या' आदेशाची धाकधूक!
सोलापुरात शरद पवारांचा "एम' फॅक्‍टर!

ओबीसीच्या जागांवरील निवडणूक स्थगित केल्यानंतर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, श्रीपूर-महाळुंग, नातेपुते व वैराग येथील नगरपंचायतीच्या उर्वरित जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या ओबीसी आरक्षणामुळे जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमधील 20 जागांवर ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार खुल्या जागांवर निवडणूक घेण्याचे ठरल्यास त्या 20 जागांसाठी पुन्हा निवडणूक अर्ज मागविले जाण्याची शक्‍यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणताही आदेश न काढल्याने जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमधील उमेदवारांनी प्रचाराचा जोर कायम ठेवला आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुकीला 'त्या' आदेशाची धाकधूक!
नको नको, बस्सं झालं म्हणत सिद्धेश्‍वर कारखान्यावर पुन्हा धर्म'राज'

झेडपीची प्रभाग रचना शांतच

राज्यातील जिल्हा परिषदांच्या (ZP) सदस्य संख्येत वाढ करण्यापूर्वी युद्ध पातळीवर सुरू असलेली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभाग रचना आता शांत झाली आहे. जागा वाढल्या परंतु प्रभाग रचनेची काहीच हालचाल दिसत नाही. त्यातच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका वेळेवर होतील का? याबद्दलच साशंकता निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()