Bail Pola : 'हौसेला नाही मोल' आजोबांच्या बैल जोड्यांचा नाद नातूही करतोय पुरा

खोंड संभाळ करणारे देशमुख कुटुंबीयांकडून साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 2009 साली एक जातिवंत बैल विकत घेतला होता.
bail pola
bail pola sakal
Updated on

सांगोला - 'हौसेला मोल नाही' असं म्हटलं जात. सांगोला तालुक्यातील कोळा येथील देशमुख कुटुंबियांनी आपल्या तिसऱ्या पिढीतही देखण्या जातीवंत खिलार बैलांचा सांभाळ करत हौसेबरोबरच जातिवंत बैलांच्या पैदाशीसाठी, शर्यतीसाठी आजही खिलार बैलांचे संभाळ करीत आहे. आजोबांनी केलेला बैलजोड्यांचा नाद नातूही उत्कृष्टरित्या पुढे नेताना दिसत आहेत.

कोळा तसं सांगोला तालुक्याच्या टोकाचे गाव. या परिसराचा तसा सांगोल्याशी कमी तर सांगलीशी जास्त संपर्क राहतो. या संपर्कातूनच कै. शामराव त्र्यंबक देशमुख यांनी आपल्या तरुणपणाच्या काळात देखण्या खिलार जातीचे बैलजोड्या सांभाळ करू लागले. त्या काळची परिस्थितीनुसार त्यांनी मेहनतीसाठी, जातिवंत बैल पैदाशीसाठी जातिवंत खिलार बैलांचा जणू त्यांना नादच लागला होता.

कै. शामराव देशमुख यांनी जातिवांचा बैल सांभाळणाचे काम त्यांची दत्तात्रय, अशोक, ज्ञानेश्वरी ही तिन्ही मुले आजही करीत आहेत. दत्तात्रय देशमुख यांचे वय आज 55 वर्षे असून त्यांचीही मुले सचिन व नितीन हेही जातिवंत बैलांचा उत्कृष्टपणे संगोपन करीत असल्याचे दिसून येत आहे.

देशमुख कुटुंबाकडे सध्या चार जातीवंत बैले आहेत. यामध्येच काळा कपिला जातीचा आकर्षक असा बैलही ते सांभाळ करीत आहेत. दत्तात्रय देशमुख यांनी शेतीकामांबरोबरच जातिवंत खिलार बैलांच्या पैदास निर्मिती करणे व शर्यतीसाठीही वेगळ्या बैलांची ते संगोपन करत आहेत. सध्या बैलांच्या संगोपनासाठी होणारा मोठा खर्च पाहता त्यांच्याकडे फक्त दोनच बैल जोड्या म्हणजे चार बैले आहेत. यातील दोन मोठे तर दोन खोंडे आहेत.

bail pola
Solapur News : हत्ती दरवाज्यातून येण्या-जाण्याचा पर्यटकांना मिळणार आनंद

जातिवंत बैले पाहण्यासाठी परिसरातील नागरिक त्यांच्या घरी सतत ये - जा करीत असतात. बैलांच्या जातीची पारख करणे, जातिवंत वळू सांभाळणे, शर्यतीसाठी वेगळ्या बैल जोड्या सांभाळण्याची चांगलीच पारख दत्तात्रय देशमुख यांना आहे. आजच्या कृत्रिम अवजारांच्या धावत्या युगातही पारंपारिक जातिवंत बैल जोड्या सांभाळण्याची हौस आजही कोळ्यातील देशमुख कुटुंबीयांची तिसरी पिढीं करीत असल्याचे दिसून येत आहे.

bail pola
Solapur News : डेंग्यू अन्‌ चिकनगुनिया रुग्णांत वाढ

छत्रपती उदयनराजेंसह अनेकांनी देशमुखांकडून घेतली जातिवंत बैल

जातिवंत बैल - खोंड संभाळ करणारे देशमुख कुटुंबीयांकडून साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 2009 साली एक जातिवंत बैल विकत घेतला होता. त्याचबरोबर 2013 साली विधानपरिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप (अहमदनगर) यांनी तर 2021 साली भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनीही देशमुख कुटुंबियांकडून जातिवंत बैल घेऊन गेले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भागात त्यांच्या खोंड, बैल विकले गेल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले.

बैल प्रदर्शनात मिळाली बक्षिसे

देशमुख कुटुंबियांनी जातिवंत बैल प्रदर्शनामधील घटप्रभा, कंकणवाडी (कर्नाटक), इचलकरंजी, खरसुंडी, करगणी (सांगली) इत्यादी प्रदर्शनात त्यांना जातिवंत बैलांसाठी बक्षिसे मिळाली आहेत.

वडील, आजोबांप्रमाणे जातिवंत बैल संगोपनाचे काम मीही नोकरी करीत आनंदाने करीत आहे. मी वनरक्षक पदावर काम करत असतानाही वेळ मिळेल तेव्हा बैलांची संगोपने तसेच प्रदर्शनाच्या ठिकाणी बैल घेऊन जाणे, बैलांना खुराक - पाण्याची व्यवस्था मी पाहतो आहे. खिल्लार जातीचे संगोपन आणि संवर्धन काळाची गरज आहे - नितीन देशमुख, कोळा.

bail pola
Solapur News : विद्यार्थ्यांनी बनविल्या तीन हजार गणेशमूर्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()