बंजारा ब्रँडची सव्वादोन लाखांची कमाई! प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

ऑपेरशन परिवर्तनातून हातभट्टी गाळणे सोडून पर्यायी व्यवसाय निवडलेल्या तांड्यावरील महिलांनी बंजारा ब्रँडअंतर्गत हस्तकलेतून विविध वस्तू बनविल्या. त्याचे प्रदर्शन सध्या ग्रामीण पोलिस मुख्यालयातील अंलकार हॉलमध्ये सुरू आहे. मागील दोन दिवसांत जवळपास आठशे सोलापूरकरांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे. त्यातून सव्वा दोन लाखांची कमाई (विक्री) झाली आहे.
opration parivartan
opration parivartansakal
Updated on

सोलापूर : ऑपेरशन परिवर्तनातून हातभट्टी गाळणे सोडून पर्यायी व्यवसाय निवडलेल्या तांड्यावरील महिलांनी बंजारा ब्रँडअंतर्गत हस्तकलेतून विविध वस्तू बनविल्या. त्याचे प्रदर्शन सध्या ग्रामीण पोलिस मुख्यालयातील अंलकार हॉलमध्ये सुरू आहे. मागील दोन दिवसांत जवळपास आठशे सोलापूरकरांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे. त्यातून सव्वा दोन लाखांची कमाई (विक्री) झाली आहे.

opration parivartan
opration parivartanप्रमुख जिल्हा न्यायाधीश शब्बीर औटी

बंजारा ब्रँडच्या प्रदर्शनात वॉल हँगिंग, हस्तकलेच्या साड्या, ब्लाऊज, पेंटिंग, दुपट्टा, टॉप, ज्वेलरी अशा विविध आकर्षक व सुबक वस्तूंची विक्री केली जात आहे. वस्तू तयार करणाऱ्यांकडून वस्तूंची विक्री दलालाविना थेट ग्राहकांना होत असल्याने त्याचे दरही परवडणारे आहेत. जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांनी भेट देत आवडलेल्या वस्तूंची खरेदीही केली. पहिल्या दिवशी २२ जुलैला प्रदर्शनाच्या उद्‌घाटनामुळे सायंकाळी सहा वाजता प्रदर्शन सर्वांसाठी खुले झाले. त्यानंतर शनिवारी (ता. २३) सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रदर्शनाला सोलापूरकरांनी भेटी देत वस्तूंची खरेदी केली. अवैध व्यवसायात गुंतलेल्यांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘उमेद’ व बॅंकांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. त्यातून कच्चा माल घेऊन त्या महिलांनी स्वत: या वस्तू तयार केल्या आहेत. पहिल्या दिवशी ५५ हजार तर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) दीड लाखाहून अधिक रुपयांच्या वस्तूंची विक्री झाली. प्रदर्शनाचा शेवट उद्या (रविवारी) होणार असून, सकाळी दहापासून सोलापूरकरांना तेथून वस्तू खरेदी करता येतील, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

ऑपेरशन परिवर्तन
ऑपेरशन परिवर्तनzp ceo dilip swami

‘या’ अधिकाऱ्यांनी केली खरेदी
बंजारा ब्रँडच्या प्रदर्शनाला आतापर्यंत प्रमुख जिल्हा न्यायाधीश शब्बीर औटी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रिसिजन फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. सुहासिनी शहा आदींनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विविध वस्तूंची खरेदी करून त्या महिलांना प्रोत्साहित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()