बार्शी तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या "या' बोगस डॉक्‍टरवर अखेर गुन्हा दाखल ! काय आहे प्रकरण? वाचा 

Crime
Crime
Updated on

बार्शी (सोलापूर) : तालुक्‍यातील सात ते आठ गावांत कोरोनाबाधित रुग्णांवर मागील तीन महिन्यांपासून कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना उपचार करून त्यांना मृत्यूच्या खाईत पोचवणाऱ्या बोगस डॉक्‍टरावर अखेर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. श्रीमंत हरिश्‍चंद्र खंडागळे (वय 51, रा. राऊत चाळ, बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्‍टरचे नाव आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

श्रीमंत खंडागळे हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना गावामध्ये फिरून, रुग्णांना घरोघरी भेट देऊन इंजेक्‍शन, सलाईन, ऍलोपॅथीची औषधे यांचा वापर केल्याचे आढळून आले आहे. बोगस डॉक्‍टर खंडागळे स्वतः कोरोनाबाधित असून त्याने हे नियमबाह्य कृत्य केले आहे. साथ उद्रेक वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून येते, असे फिर्यादीत म्हटले आहे. लॉकडाउन होताच तालुक्‍यात प्रथम जामगाव येथे बाधित रुग्ण आढळला होता. त्याच्यावरी खंडागळेनेच उपचार केले होते. रुग्णांची प्रकृती गंभीर होताच खासगी रुग्णालयात पाठवत असे. जामगावचा रुग्ण त्यातच दगावला. अवघी अकराशे लोकसंख्या असलेल्या या गावात आज 33 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 

मागील तीन महिन्यांपासून आरोग्य प्रशासन त्याला का पाठीशी घालत आहे? गोंजारत आहे, याबाबत अधिकारी व पत्रकार यांच्यामध्ये चर्चा होताच, आरोग्य प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. आरोग्य प्रशासनाने पूर्वीच गुन्हा दाखल केला असता तर ग्रामीण भागात एवढा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नसता, असे अनेक डॉक्‍टर खासगीत बोलत आहेत. अखेर भारतीय साथ रोग नियंत्रण, बोगस डॉक्‍टर कायद्यानुसार खंडागळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.