बार्शीचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप यांचा झारखंडमध्ये सन्मान !

बार्शीचे सुपुत्र आयएएस घोलप यांचा झारखंडमध्ये सन्मान! राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन डायरेक्‍टरपदी नियुक्ती
बार्शीचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप यांचा झारखंडमध्ये सन्मान !
बार्शीचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप यांचा झारखंडमध्ये सन्मान !Sakal
Updated on
Summary

या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मळेगाव (सोलापूर) : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्‍यातील महागावचे सुपुत्र व कोडरमा (झारखंड) (Jharkhand) जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रमेश घोलप (Ramesh Gholap) यांनी आपले प्रशासकीय कौशल्य दाखवत कोरोना (Covid-19) विरुद्धच्या लढाईत अत्यंत प्रभीावपणे अनेक निर्णय राबविले. स्वतः रस्त्यावर उतरून प्रशासनाला सोबत घेत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला थोपविण्यात यश मिळवले. याच प्रशासकीय कौशल्याची व अनुभवाची दखल घेत झारखंड सरकारने आयएएस रमेश घोलप यांची राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन, झारखंड राज्याचे मिशन डायरेक्‍टर म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बार्शीचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप यांचा झारखंडमध्ये सन्मान !
'MPSC'च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा!

रमेश घोलप 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोडरमा जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबविल्या. त्यास आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, शिक्षक तसेच नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये शंभर जणांची 'सर्व्हिलान्स टीम' निर्माण केल्यामुळे रुग्णसंख्या आटोक्‍यात आली व मृत्यूदरही कमी झाला. दुर्गम भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून दिला. लोकसहभागातून फूड बॅंक योजना राबविली, त्यामधून अनेकांना धान्य व जेवणाचे किट वाटप करण्यात आले. कोरोना रुग्णांना जागेवरच कोरोना किटचे वाटप केल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाली. 'टेली मेडिसीनच्या' माध्यमातून 24 तास डॉक्‍टरांची सेवा उपलब्ध करून दिली. कोडरमासारख्या दुर्गम भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत असलेली उदासीनता घालवून 'टीकाकरण चौपाल'वर अधिक भर दिला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांमध्ये जाऊन लसीकरण जागृती केल्यामुळे कोडरमा जिल्ह्यात विक्रमी लसीकरण झाले. त्यामुळे झारखंड राज्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या व लसीकरण करण्याचा बहुमान मिळाला असल्याचे घोलप यांनी सांगितले.

250 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, लहान मुलांसाठी ऑक्‍सिजन बेडयुक्त वॉर्डची निर्मिती, पाच तासांमध्ये बंद पडलेल्या हॉस्पिटलची नव्याने उभारणी करून रमेश घोलप यांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळवले. कोरोनाच्या संसर्गामुळे अनाथ झालेल्या 50 मुलांचे पालकत्व स्वीकारून प्रशासनाबरोबरच एक माणुसकीचे दर्शनही घडवले आहे. उमेद प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोना काळात बार्शी तालुक्‍यातील कलावंताला केलेली आर्थिक मदत, गरजूंना किराणा किटचे केलेले वाटप, दवाखान्यात उपचारासाठी केलेली दीड लाखाची मदत तसेच दिवाळीच्या सणा निमित्ताने दीड लाखांचे दिवे खरेदी करून कारागिरांची दिवाळी गोड केली. या लोकोपयोगी व समाजोपयोगी कार्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

बार्शीचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप यांचा झारखंडमध्ये सन्मान !
दोन्ही बायकांचा मुख्याध्यापक पतीला शॉक अन्‌ तो झाला पोलिस ठाण्यात लॉक!

कोविड व्यवस्थापनात केलेल्या कार्याचे राज्याचे मुख्यमंत्री, स्वास्थ्यमंत्री, मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी कौतुक केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशनचे झारखंड राज्याचे मिशन डायरेक्‍टर म्हणून जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता राज्यात प्रभावी उपाययोजना करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. शिवाय झारखंडसारख्या राज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आरोग्य योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.