पत्नीच्या आजारपणामुळे ‘तो’ बनला चोर! ५२ व्या वर्षी चोरल्या १० दुचाकी

पेंटर म्हणून मिळेल तेथे काम करणारा शफी मौला शेख (वय ५२, रा. नई जिंदगी) याला दोन मुले आहेत. त्यांचा सांभाळ करताना पत्नीला पॅरेलेसीस झाल्याने ती बेडवरच पडून आहे. शफीच्या कमाईतून पत्नीच्या उपचाराचा खर्चही भागत नव्हता. त्यामुळे तो हँडल लॉक नसलेल्या दुचाकी चोरून दुसऱ्याकडे गहाण ठेवून पैसे मिळवायचा.
solapur city crime police officers
solapur city crime police officerssakal
Updated on

सोलापूर : पेंटर म्हणून मिळेल तेथे काम करणारा शफी मौला शेख (वय ५२, रा. नई जिंदगी) याला दोन मुले आहेत. त्यांचा सांभाळ करताना पत्नीला पॅरेलेसीस झाल्याने ती बेडवरच पडून आहे. शफीच्या कमाईतून पत्नीच्या उपचाराचा खर्चही भागत नव्हता. त्यामुळे तो हँडल लॉक नसलेल्या दुचाकी चोरून दुसऱ्याकडे गहाण ठेवून पैसे मिळवायचा. त्याला पोलिसांनी ८ जुलैला अटक केली असून, त्याच्याकडून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

दुचाकी चोरणारा शफी शेख हा चोरीची दुचाकी घेऊन कुमठा नाका परिसरातील पारशी विहिरीजवळील महापालिकेच्या बस थांब्याजवळ उभा असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने ८ जुलैला त्या ठिकाणी सापळा रचला. त्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आणि दुचाकी चोरीबद्दल चौकशी केली. त्यावेळी होम मैदान, गणपती घाट, रूपाभवानी मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून दहा दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. पत्नीच्या आजारपणामुळे दुचाकी चोरल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांना मिळाल्याने शफी शेख याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली. ही कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार अमित रावडे, श्रीकांत पवार, राहुल तोगे, विजयकुमार वाळके, गणेश शिंदे, नवनीत नडगेरी, सचिन होटकर यांच्या पथकाने केली.

कमी पैशात विकायचा विनानंबरप्लेट दुचाकी

हँडल लॉक केलेल्या दुचाकी कशा चोरायच्या, याची माहिती नसल्याने व त्याला वेळ लागत असल्याने शफी शेख हा केवळ हँडल लॉक नसलेल्याच दुचाकी चोरी करत होता. दुचाकी चोरीनंतर त्याची नंबरप्लेट काढून तो त्या दुचाकी थेट न विकता गहाण ठेवायचा आणि लागेल तेवढे पैसे संबंधितांकडून घ्यायचा, ही बाब पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी विनानंबरप्लेट असलेल्या दुचाकींच्या चेसी व इंजिन नंबरवरून त्या दुचाकींच्या क्रमांकाची खात्री केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()