दिवाळीतील आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. भावा- बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा दिवस. याचे पुराणातही अनेक उल्लेख आहेत. दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो, ज्याला यमद्वितीया असेही म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण करून औक्षण केले तर अकाली मृत्यूदेखील होत नाही, असे शास्त्र सांगते.