भोसे (सोलापूर) : मंगळवेढ्याच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता राजकुमार पांडव यांच्या ऐन उन्हाळ्यातील नेटक्या नियोजनामुळे तीव्र उन्हाळा व ऐन टंचाईच्या काळात मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील पाणी पुरवठ्याचे सार्वजनिक स्त्रोतानी तळ गाठला. असे असताना भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाण्यामुळे दक्षिण दुष्काळी भागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Bhose-regional-water-scheme-beneficial-to-south-solapur)
भोसे व इतर 39 गावासाठी दिवंगत आमदार भारत भालके यांनी राबवलेली भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वीज बिलाच्या व इतर खर्चाच्या मानाने तसेच ग्रामपंचायतीकडून मिळणारा अत्यल्प प्रतिसाद आहे. सध्या सुरु असलेले कोरोना महामारीचे संकट या पार्श्वभूमीवर वसुली अभावी योजना बंद पडण्याच्या मार्गावर असतानादेखील सदर योजनेच्या शिखर समितीच्या अध्यक्षा मनीषा खताळ व सचिव जमीर मुलांनी यांनी वारंवार पाठपुरावा केला. योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावचे सरपंच व ग्रामसेवकांना संपर्क साधून थकित पाणीपट्टी भरणा करणे विषयी केलेल्या प्रयत्नांना थोड्या प्रमाणात का होईना पण यश मिळून साडेतीन लाखापर्यंतची रक्कम जमा झाल्यानंतर सदर योजनेच्या वीज बिलाचा हप्ता भरून योजनेला तात्पुरत्या स्वरुपात नवसंजीवनी प्राप्त झाली आहे.
कित्येक गावांना आजमितीस या योजनेचा आधार असून योजना सुरू झाल्यामुळे शासनाचा टॅंकरसाठी खर्च होणारा लाखो रुपयांचा निधी बचत झाला आहे. त्याप्रमाणे ऐन टंचाईच्या काळात टँकरच्या नियोजनासाठी प्रशासनाची होणारी धावपळ बऱ्याच अंशी थांबवण्यात सदर यंत्रणेला यश मिळाले आहे. पावसाळा भविष्यात लांबला तर टंचाई परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता विचारात घेता, योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीनी आपापल्या ग्रामपंचायतीकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम भरणा करुन सदर भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला बळ देण्याची गरज आहे.
सध्या सदर योजनेमधून 14 गावांना पाणीपुरवठा सुरु असून इतर गावांनी देखील भविष्याच्या दृष्टीने या योजनेची थकबाकी भरुन ही योजना समाविष्ट असणाऱ्या सर्व गावांमध्ये कायमस्वरूपी सुरु ठेवण्यास सहकार्य करणे गरजेचे असून भावी काळात सदर योजना कायमस्वरूपी सुरु राहण्यासाठी प्रशासनाने देखील वेळीच लक्ष घालून योजनेत समाविष्ट सर्व गावामध्ये सुरळीत पाणीपुरवठा कायमस्वरुपी कसा सुरु राहिल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांनी दुष्काळी पट्ट्यातील पाणी टंचाई ओळखून अथक परिश्रम करून सुरु केलेली भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अतिशय चांगली योजना आहे. गावोगावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी या योजनेचे महत्त्व ओळखून व गावचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वेळच्या वेळेस सदर योजनेचा कर भरून सहकार्य केल्यास या योजनेत कुठलीही अडचण राहणार नाही व सर्व गावांना मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकेल.
- मनीषा खताळ, अध्यक्षा-शिखर समिती भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
(Bhose-regional-water-scheme-beneficial-to-south-solapur)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.