Abhijit Patil: राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटलांना धक्का! विठ्ठल कारखान्यावर राज्य बँकेची जप्ती, शरद पवार जिल्ह्यात असताना कारवाई

Abhijit Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोठा धक्का बसला आहे.
Abhijit Patil
Abhijit Patilesakal
Updated on

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार हे करमाळा येथील प्रचार सभेत असताना गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. थकीत कर्जप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने ही कारवाई केल्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

संचालक मंडळाची तातडीची बैठक

बँकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची तातडीची बैठक पार पडली. पाटील यांनी कारवाईची माहिती दिली. सर्व संचालक मंडळ तुमच्या पाठीशी ठामपणे मागे आहे. आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याची आमची तयारी आहे. तुम्ही कोणताही निर्णय घ्या. आम्ही सोबत आहोत, असा विश्वास पाटील यांना दिला.

Abhijit Patil
Shirur Loksabha : डॉ. अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध ; पुणे ४२, शिरूर ३५ अन् मावळ मतदारसंघातून ३५ उमेदवार रिंगणात

राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज, असे एकूण ४३० कोटी रुपये थकविल्याप्रकरणी प्राधिकृत अधिकारी तथा सहायक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी केलेल्या तक्रारीनुसार कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईच्या विरोधात अभिजित पाटील यांनी पुणे येथील डीआरटी न्यायालयात अपील केले होते.

त्यावर सुनावणी सुरू होती. दरम्यान, गुरुवारी (ता. २५) डीआरटी न्यायालयाने कारवाईला दिलेली स्थगिती उठवली. त्यानंतर तातडीने आज (ता. २६) एमएससी बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल कारखान्यावर येऊन पोलिस बंदोबस्तात साखरेची सर्व गोदामे सील करून साखर कारखाना जप्त करण्याची कार्यवाही केली आहे.

Abhijit Patil
Rahuri News : निळवंडेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; शरद पवार यांची विखेंवर टीका, राहुरी येथे ‘मविआ’ची सभा

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अभिजित पाटील हे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सक्रिय आहेत. ते आज सकाळी करमाळ्यातील शरद पवार यांच्या सभेला उपस्थित होते. त्याचवेळी राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे अभिजित पाटील हे सभा अर्धवट सोडून पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. या कारवाईमुळे अभिजित पाटील आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

Abhijit Patil
Sharad Pawar : मोदी यांचे वक्तव्य देशाच्या ऐक्याविरोधात - पवार ; पंतप्रधान पदावरील व्यक्ती असे बोलूच कशी शकते?

सात ते आठ महिन्यापूर्वी अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या सभेत बोलताना शरद पवार यांनी अभिजित पाटील यांच्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या.

भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडून भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. आताही शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यात असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. कारवाई दरम्यान बॅंकेने तीन गोदामातील सुमारे ३९ कोटी रुपयांची साखर जप्त केली आहे. बॅंकेने मागील संचालक मंडळाच्या थकीत वसुलीसाठी जप्तीची कारवाई केल्याने सभासद आणि कामगारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Abhijit Patil
Sharad Pawar : शेतकरीकल्याणाला प्राधान्य ; जातिनिहाय जनगणनेचा शपथनामा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.