हेल्मेट नसल्यास द्यावा लागणार 'इतका' दंड! हेल्मेट घाला अन्‌ जीव वाचवा

सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा. त्यामुळे लाख मोलाचा जीव वाचतो.
helmet
helmetesakal
Updated on
Summary

सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा. त्यामुळे लाख मोलाचा जीव वाचतो.

सोलापूर: देशात दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोक मरण पावतात. त्यात विनाहेल्मेट असलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा. त्यामुळे लाख मोलाचा जीव वाचतो. सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्‍त डॉ. दिपाली धाटे यांनी केले आहे.

helmet
सोलापूर : सेवानिवृत्तीनंतरही मिळेना वेतनातील फरक

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही अनेकजण बेशिस्तपणे वाहने चालवितात. त्यांच्याकडे दंड मागण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना उध्दटपणे बोलण्याचे प्रकारही होतात. परंतु, वाहतूक पोलिस हा त्या वाहनचालकास शिस्त लागावी या हेतूनेच कारवाई करतो, असे डॉ. धाटे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयानेही विनाहेल्मेट चालविणाऱ्या दुचाकीस्वाराला पाचशेचा दंड रास्तच असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्या आदेशानुसार दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसल्यास त्याला पाचशेचा दंड ठोठावला जातो. परंतु, शहरात त्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. कोणत्याही नियमांचे सक्‍ती करण्यापूर्वी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही केले. त्यामुळे सर्व दुचाकीस्वारांनी स्वत:चा जीव सुरक्षित राहावा, घरी वाट पाहणाऱ्या कुटुंबियांची चिंता दूर व्हावी म्हणून नियमित हेल्मेट वापरावेच, असे स्पष्ट केले.

helmet
सोलापूर : महापालिकेच्या गाड्या निघणार स्क्रॅपमध्ये

...म्हणून त्या दुचाकीस्वाराचा जीव वाचला

काही दिवसांपूर्वी स्पोर्टस बाईक घेऊन सुसाट निघालेल्या एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसाने अडविले. तो थांबला आणि त्याला पोलिसांनी पाचशे रुपयांची दंडाची पावती दिली. त्यावेळी तो दोनशे रुपये घ्या आणि सोडून द्या म्हणाला. मात्र, संबंधित पोलिसाने त्याच्याकडून दोनशे रुपये न घेता दंड भरण्यास सांगितले. त्या दुचाकीस्वाराकडे हेल्मेट होते, परंतु गाडीमागे लटकवलेले होते. त्याला पाचशे रुपयाचा दंड भरायला लावला आणि हेल्मेट घालून पुढे पाठविले. काही अंतरावर गेल्यानंतर अपघात झाल्याचा मोठा आवाज आला. त्यावेळी वाहतूक पोलिस त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी एका चारचाकी वाहनाला दोन दुचाकींची धडक बसली होती. त्यात दुसऱ्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दंड भरुन पुढे गेलेल्या दुचाकीस्वाराच्या हाता-पायाला दुखापत झाली होती. मात्र, हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला होता. दवाखान्यातून बरा होऊन आल्यानंतर त्या दुचाकीस्वार तरूणाने आवर्जुन तेथील वाहतूक पोलिसांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले, असे डॉ. धाटे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.