MP Supriya Sule : भाजपने महाराष्ट्रातील चार नेत्यावर खुप अन्याय केला आहे

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करुन गुजरातचे महत्व वाढवण्यासाठी भाजपची अदृश्य शक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
MP Supriya Sule
MP Supriya Sulesakal
Updated on

कुर्डू (सोलापूर) - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील चार नेत्यावर भारतीय जनता पार्टीच्या अदृश्य शक्ती अर्थात अमित शहा यांनी खूप अन्याय केल्यामुळेच ते अडचणीत आले आहेत. आणि या चौघांच्या विरोधात बोलले की मला खुप राग येतो, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.

कुर्डू, ता. माढा, जिल्हा सोलापूर येथील मंगल कार्यालय आयोजित करण्यात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विनायकराव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर रोहिणी खडसे, अभिजित पाटील, संजय पाटील घाटणेकर, बळीराम साठे, अभिजीत पाटील, बाळासाहेब पाटील, औदुंबर देशमुख, आशा टोणपे, दत्ताजी गवळी, अनुराधा गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्राचे महत्त्व कमी करुन गुजरातचे महत्व वाढवण्यासाठी भाजपची अदृश्य शक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी जन्माला घातलेलं पक्ष यांनी खोक्यांची व पदांची आमिश दाखवून फोडले. फडणविस यांनी १०५ जागा आणुन ही त्यांना उपमुख्यमंत्री केले व गडकरी यांचे केंद्रातील अधिकार कमी केल्याने यांच्या वरच फार मोठा अन्याय केल्याचे सांगितले.

मी जर संसदेत सरकार विरोधात बोलले की, लगेचच घरी इन्कम टॅक्सची नोटीस घरी येते. व नवऱ्याचा मेसेज येतो लव लेटर आले. तुम्ही सरकार विरोधात बोलला की आईस लागला म्हणून समजाच. 'आईस'चा अर्थ 'इन्कम टॅक्स'ची नोटीस, सीबीआय चे झंझट आणि ईडीची कारवाई होतेच. मी त्याचे जीवंत उदाहरण असल्याचे सांगितले.

हे महाराष्ट्रातील ट्रीपल इंजिन खोके सरकार काँट्रॅक्ट बेसिसवर अधिका-यांच्या नेमणूका करतय म्हणजेच त्यांना आरक्षणाचा रस्ता बंद करायचा आहे. हा संविधानाचा अपमान आहे. शाळा बंद करून दारची दुकाने वाढवत आहात अशा या सरकारचा २०२४ च्या निवडणुकीत " करेक्ट कार्यक्रम " करण्याचा निर्धार करा असे आवाहन त्यांनी केले.

पवार साहेबांबाबत काही उलट सुलट बोललात तर तीन वेळा ऐकून घेईन, चौथ्या वेळेस असा करारा जवाब देईन, तुमचे मतदार संघात फिरणे मुश्किल होईल. असा सज्जड दम ही नामोल्लेख टाळून दिला.

सर्वे सरकारच्या विरोधात येत असल्याने कोणत्याही निवडणुका घेण्याचे धाडस या सरकार मध्ये नसल्याने आता एक वर्षानंतरच निवडणुका होतील असा अंदाज सुळे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, सध्या राज्यात दुष्काळाची छाया आहे, सरसकट राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करून राजकारणात जे दिसतेय त्या पेक्षा वेगळी परिस्थिती आहे. विनाकारण धास्ती घेऊ नका. सगळे जण पराभव करण्याच्या तयारीत आहेत ही संधी आपण गमवायची नाही, जोमाने तयारीला लागा असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील घाटणेकर हे माढा लोकसभा मतदारसंघातुन शरद पवार यांना जेवढं मताधिक्य दिले होते तेवढेच मताधिक्य इंडिया आघाडी च्या उमेदवाराला दिल्या शिवाय शांत बसणार नाही.असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील घाटणेकर यांनी केले. यावेळी कविता म्हेत्रे, बाळासाहेब पाटील, औदुंबर देशमुख, संतोष वारे व अभिजीत पाटील यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी तर आभार दत्ताजी गवळी यांनी मानले.

राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणूक आयोगा पुढील सुनावणी बद्दल बोलताना म्हणाल्या की प्रेमाने मागितले असते तर दिले असते पण तुम्ही वडिलांचा पक्ष हिसकावून न्यायला लागला तर कदापिही मिळणार नाही. तुम्ही बायकांच्या नादी लागू नका एकदा का लाटणे या खोके सरकारच्या मागे लागले तर तुम्ही नेस्तनाबूत होताल. असे सांगून ८३ वर्षाच्या पवार साहेबांनी या पक्षाला जन्म दिलाय त्याविरूद्ध लढताना पवार साहेब स्वतः बाजू मांडायला गेले होते. त्यांचा फक्त वकील आला होता. त्या वकीलाचाही करेक्ट कार्यक्रम केला नाही तर सुप्रिया सुळे नाव सांगणार नाही असे त्या म्हणाल्या.

इंडीया चा पाच कलमी कार्यक्रम -

१) शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमीभाव देईल.

२)महाराष्ट्रातील प्रत्येक महिला व मुलींना सुरक्षिततेची हमी देईल.

३) जी मुले शाळाबाह्य आहेत त्यांना मोफत शिक्षण दिले जाईल.

४) प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी सरकार घेईल.

५) संपूर्ण राज्यातील जुन्या एस. टी बसेस नव्या घेईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.