भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख म्हणाले की, उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळवण्याचा बारामतीकरांनी घाट घातला होता. यामुळे राष्ट्रवादी व बारामतीकराविरोधात जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
पंढरपूर (सोलापूर) : उजनीतील (Ujani Dam) पाच टीएमसी पाणी (TMC water) सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली इंदापूरला (Indapur)उचलण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचे भाजपच्या वतीने आम्ही स्वागत करतो. पाण्याची पळवापळवी करण्यात माहिर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची स्वाक्षरी होऊन जलसंपदा विभागाचा आदेश होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. उजनीचे पाणी पळवणारे खरे सूत्रधार अजित पवार (Ajit Pawar) असून ते शब्द फिरवण्यात पटाईत असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी आज केली. (BJP-solapur-president-shrikant-deshmukh-criticized-ajit-pawar)
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले की, उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळवण्याचा बारामतीकरांनी घाट घातला होता. यामुळे राष्ट्रवादी व बारामतीकराविरोधात जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र, या निर्णयाचा भाजपने तीव्र विरोध केला होता. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द केल्याचे कालच जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे भाजप स्वागत करत आहे. मात्र या रद्द केलेल्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी होऊन शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत भाजपच्या जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पक्ष पदाधिकाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
भाजप हा विरोधासाठी विरोध करणारा पक्ष नाही. परंतु या घोषणेची आम्हाला व शेतकऱ्यांना शंका आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 एप्रिलला इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याच्या सर्व्हेक्षणाला प्रशासकीय मान्यता दिली आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच वारंवार सांगितले आहे. उजनीचे पाणी इंदापूरला देण्यासाठी भाजपचा विरोध असून यापुढेही आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला आहे. मात्र त्यावेळी पालकमंत्री भरणे उपस्थित नव्हते, तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील स्थगिती आदेश दिला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
यापूर्वी खा.रणजितसिंह निंबाळकर यांनी नीरेचे पाणी डाव्या कालव्यातून उजव्या कालव्यात सोडून फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला होता. मात्र, आघाडी सरकार सत्तेत येताच उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय ताकदीचा वापर करून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत निरेचे पाणी पूर्ववत डाव्या कालव्यातून बारामतीला सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यास स्थगिती दिली, अन् अधिवेशन सुरळीत पार पाडले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले.
यावरून राष्ट्रवादीचे मंत्री बनवाबनवी करण्यात हुशार असल्याने त्यांच्यावर जनतेचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे, कालच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचे सांगितले आहे. मात्र या निर्णयावर आमचा व शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही. या घोषणेमागे लबाडी दडली आहे. कारण उजनीचे पाणी पळवण्याचे मुख्य सूत्रधार अजित पवार आहेत. कमकुवत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी होऊन इंदापूरला उजनीचे 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द झाल्याचा शासन निर्णय होत नाही तो पर्यंत पाण्यासाठी भाजपचे आंदोलन सुरू राहणार आहे. जिल्ह्यात 21 मे ते 1 जून पर्यंत कडक लॉकडाऊन असल्याने प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी 1 जून नंतर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर खासदार, आमदारांचे आंदोलन होणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. (BJP-solapur-president-shrikant-deshmukh-criticized-ajit-pawar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.