चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानपरिषदेसाठी परिचारकच उमेदवार!

सर्वच नगरसेवकांना पक्षाकडून प्रगती पुस्तक देण्यात येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संवाद मेळाव्यावेळी सांगितले.
chandrakant Patil and prashant paricharak
chandrakant Patil and prashant paricharakesakal
Updated on
Summary

सर्वच नगरसेवकांना पक्षाकडून प्रगती पुस्तक देण्यात येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संवाद मेळाव्यावेळी सांगितले.

सोलापूर: भाजप विधानपरिषदेचे आठही जागा लढणार आहे. सोलापुरातून प्रशांत परिचारक हे भाजपचे उमेदवारी असणार आहेत. तर पक्षीय तत्वांशी बांधील राहून नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये 90 टक्के नगरसेवक पास झाले आहेत. तर दहा टक्के नगरसेवक नापास झाले आहेत. सर्वच नगरसेवकांना पक्षाकडून प्रगती पुस्तक देण्यात येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संवाद मेळाव्यावेळी सांगितले.

chandrakant Patil and prashant paricharak
"पांडुरंग' देणार गेल्या हंगामातील प्रतिटन उसाला 206 रुपयांचा हप्ता : आमदार प्रशांत परिचारक 

शांतीसागर मंगलकार्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवक, शहर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, युवा मोर्चा पदाधिकारी आदी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यावेळी खा. जयसिध्देश्‍वर महाराज, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सरचिटणीस शशी थोरात उपस्थित होते. यावेळी नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधले. पक्ष संघटन हे महत्त्वाचे आहे, हे कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. कोणावाचून पक्षाचे काहीही अडत नाही, असे म्हणत पक्षशिस्त न पाळणार्‍यांना प्रदेशाध्यक्षांनी कानपिचक्या दिले. प्रत्येक नगरसेवकांच्या वर्तणुकीसह कामाचा अहवाल तयार असून पक्षाकडून सगळ्यांनाच प्रगती पुस्तकाचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे.

यामध्ये 90 टक्के नगरसेवक हे पास झाले असून 10 टक्के नगरसेवक नापास झाले आहेत, असेही पाटील यांनी मेळाव्यात जाहीरपणे सांगितले. मात्र नगरसेवक व इतर पदाधिकार्‍यांचा पक्षीय उपक्रमातील सक्रीय सहभाग कमी झाला आहे. एकदा नगरसेवक म्हणून पक्षाकडून निवडून आल्यानंतर अगदी बोटावर मोजण्या इतपतच नगरसेवक हे पक्षाच्या कार्यालयाकडे जातात. अन्यथा पाच वर्षात एकदाही न फिरकलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही अधिक असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या मेळाव्यास नगरसेवकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

chandrakant Patil and prashant paricharak
ठाकरे सरकारमुळे हजारो शेतकऱ्यांची दिवाळी आंधारात : आमदार परिचारक

शहरात प्रत्येकाच्या घरात दिवाळी झाली पाहिजे, कार्यकर्त्यांवर दिली जबाबदारी

सोलापूर शहरात कोरोनामुळे अथवा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ज्यांच्या घरात दिवाळी साजरी होणार नाही, अशा प्रत्येकाच्या घरात भाजपच्या मदतीने दिवाळी साजरी करावी. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी वाटून घेऊन तसे नियोजन करावे, असे सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

प्रदेशाध्यक्षांच्या या प्रश्‍नावर नगरसेवक निरुत्तर

यंदा आपण निवडून येत नाही, असे कोणाला वाटते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचे मार्जिन कमी होईल, असे कोणाला वाटते. गतवेळेपेक्षा येत्या निवडणुकीत स्वतःच्या मतदानाची टक्केवारी वाढेल, असे कोणाला वाटते. या प्रश्‍नावर नगरसेवकांना हात वर करण्यास सांगितले. मात्र एकाही नगरसेवकाचे हात वर झालेच नाही.

बातमीदार : प्रमिला चोरगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.