सोलापूर - अंध व्यक्तीच्या वापरातील काठीला सेन्सर बसवून ही काठी अधिकाधिक उपयुक्त करण्यासाठीचे संशोधन सुरु असल्याची माहिती डिजिटल टेक्नॉलॉजी उद्योजक शुभम अगरवाल यांनी दिली. सकाळशी बोलताना त्यांनी संशोधन व नविन तंत्रज्ञानाच्या संदर्भात बातचीत केली.
सुरवातीला अंध व्यक्तीच्यासाठीचे मोबाईल ॲप बनवले होते. या ॲपचा उपयोग एकूण ४२ देशात केला गेला. नॅशनल क्रॉनिकल ऑफ ब्लाईंडस या संस्थेने या संशोधनाची नोंद घेतली. हे ॲप आवाजाच्या आधारे मोबाईल फंक्शन उपलब्ध करुन दिले. त्यानंतर गुगलने नवे फिचर काढून अंध व्यक्तीच्या उपयोगासाठी आवश्यक ते तांत्रिक बदल केले.
त्यानंतर आता आम्ही अंधांच्या वापरासाठीच्या पांढरी काठीबाबत संशोधन करत आहोत. या काठीला योग्य ते सेन्सर बसवून त्याचा उपयोग प्रभावीपणे कसा करता येईल याचा प्रयत्न संशोधनातून केला जात आहे. लवकरच हे संशोधन अंध व्यक्तीच्या उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे.
अगरवाल टेक्नॉलॉजी उद्योगाचा विस्तार सध्या ७ देशात झाला आहे. डिजिटल मार्केटिंग, वेबसाइट डेव्हलपमेंट, ग्राफीक्स डिझायनिंग या क्षेत्रात आहे. ऑनलाइन लोकसंख्या वाढत असताना ऑनलाइन क्षेत्रात संधी देखील वाढत आहेत. नागरिकांना उपयोगी ठरतील अशा शासनाच्या लिंक्सची माहिती देणारे ॲप देखील उपलब्ध केले आहे.
एआयमुळे लवकरच मोठे बदल होणार आहे. मोबाईलची गरज कमी होऊन त्याऐवजी व्हेरीएबल टेक्नॉलॉजीचा वापर वाढणार आहे. शेतीक्षेत्रात देखील ड्रोन व ड्रीप टेक्नॉलॉजीचा वापर एआयद्वारे करता येईल. सोलापुरात आयटी व्यवसायाला मोठी संधी आहे. ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही गावात राहून काम करता येत असल्याने या व्यवसायासाठी कुठूनही मनुष्यबळ उपलब्ध करुन घेता येते असे त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.