डेंग्यू होऊ नये म्हणून 'हे' करा उपाय !

डेंग्यू होऊ नये म्हणून "हे' करा उपाय ! संशयितांची दीडशे रुपयांत रक्‍त तपासणी
डेंग्यू
डेंग्यूe sakal
Updated on
Summary

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन धुराळणी मशिन, दोन ऑटो मॉडंटेड आणि 107 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सोलापूर : शहरात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Municipal Health Department) सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत धुराळणी व फवारणी करण्याचे नियोजन केले आहे. संशयित रुग्णांची महापालिकेच्या डफरीन चौकातील मदर तेरेसा पॉलिक्‍लिनिकमध्ये 150 रुपयांमध्ये तपासणी केली जाईल, असे महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी पत्रक काढून कळविले आहे.

डेंग्यू
पालकमंत्री भरणेंना मंत्रिमंडळातून काढून टाका : आमदार शहाजी पाटील

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन धुराळणी मशिन, दोन ऑटो मॉडंटेड आणि 107 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी पाणी झाकून ठेवावे, स्वच्छ पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्यास ते पाणी ओतून भांडे कोरडे करावे, कोरड्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पाणी भरावे, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी केले आहे. दरम्यान, डेंग्यूसदृश रुग्णांच्या रक्‍त तपासणीसाठी खासगी रुग्णालयात दोन हजार रुपये मोजावे लागतात. हा खर्च सर्वसामान्यांना परवडत नसल्याने महापालिकेतर्फे ती चाचणी दीडशे रुपयांत केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. घरोघरी कंटेनर सर्व्हे सुरू असून नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना सांगितल्या जात आहेत. संशयितांची रक्‍त चाचणी तत्काळ झाल्यास वेळेत निदान करता येणार आहे. त्यामुळे महापालिकेने सर्वसामान्यांसाठी माफक दरात रक्‍त चाचणी करण्याचे नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांना रेबीजची मोफत लस

शहरातील नागरिकांना रेबीज इंजेक्‍शन दिले जाणार आहे. महापालिकेच्या 15 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये हे लसीकरण होणार आहे. आज (मंगळवारी) नागरिकांना मदर तेरेसा पॉलिक्‍लिनिक या ठिकाणीदेखील रेबीजची लस टोचली जाणार आहे. आधार कार्डच्या झेरॉक्‍सवर नागरिकांना मोफत लस मिळेल, असेही डॉ. हराळकर यांनी या वेळी सांगितले. काही दिवसांपूर्वी नगरसेवकांनी त्यासंबंधीची मागणी केली होती.

डेंग्यू
कॉंग्रेसचे वड्डेटीवार 'या' मागणीसाठी सोडणार मंत्रिपद !

डेंग्यूपासून असा करा बचाव

  • गरजेपेक्षा अधिक पाणी साठवून ठेवू नका; साठवलेले पाणी झाकून ठेवा

  • घराजवळ, घरासमोर पाणी साचू देऊ नका; पाण्याचा दररोज निचरा होईल असे नियोजन करा

  • घरातील झाडांच्या कुंड्यातील पाणी दररोज बदलावे; त्यात पाणी साचू देऊ नका

  • आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा; सायंकाळी घराचे दरवाजे, खिडक्‍या बंद करा

  • खिडक्‍या, दरवाजाला जाळ्या बसवा; जेणेकरून डास घरात येणार नाहीत

  • साठवलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या होणार नाहीत याची दक्षता घ्या; अळ्या आढळल्यास भांडे तत्काळ कोरडे करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.