नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडील 'बॉडी-वॉर्न'मध्ये होणार रेकॉर्ड

नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडील 'बॉडी-वॉर्न'मध्ये होणार रेकॉर्ड
नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडील 'बॉडी-वॉर्न'मध्ये होणार रेकॉर्डsakal
Updated on
Summary

रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

सोलापूर : रस्ते अपघात (Road Accidents) टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तरीही, वाहतूक पोलिसांकडून विनाकारण अडवणूक करून पैशांची मागणी केली जाते, अशा स्वरूपाच्या तक्रारींत वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता वाहतूक पोलिसांकडील बॉडी-वॉर्न कॅमेऱ्याच्या (Body-Warn Camera) मदतीने वाहनचालक व वाहतूक पोलिसांमधील आरोप- प्रत्यारोपातील सत्यता पडताळता येणार आहे. (Body-warn cameras from the traffic police will record the drivers breaking the rules)

नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडील 'बॉडी-वॉर्न'मध्ये होणार रेकॉर्ड
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुशीलकुमार शिंदेंचे दौरे कमी!

शहरातून ये-जा करताना बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करताना अनेकदा वाहनचालक व वाहतूक पोलिसांत वादविवाद होतात. त्यानंतर वाहनचालक म्हणतात, वाहतूक पोलिसांनी पैसे घेतले किंवा मागितले, तर वाहतूक पोलिस म्हणतात, वाहनचालकाने शिवीगाळ केली किंवा नियम मोडला. त्यानंतर अनेकदा संबंधित वाहनचालकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे (Crime) दाखल होऊ लागले. परंतु, पुराव्याअभावी अनेकांची न्यायालयातून निर्दोष सुटकाही होते. काहीवेळा लाच न दिल्याने जाणीवपूर्वक कारवाई केली, असाही आरोप वाहनचालकांकडून केला जातो. त्यातून वाहतूक पोलिसांची प्रतिमा खराब होऊ लागली. या सर्व बाबींवर उपाय म्हणून 'बॉडी-वॉर्न'चा पर्याय समोर आला आहे.

32 जीबी रेकॉर्डिंग साठवण क्षमता असलेल्या या कॅमेऱ्यात ऑडिओ व व्हिडिओदेखील रेकॉर्ड होणार आहे. तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश (Ankush Shinde) शिंदे यांच्या पुढाकारातून मागील वर्षी त्याची ट्रायल झाली होती. बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईदरम्यान त्या कॅमेऱ्याचा मोठा फायदा होतो, ही बाब अधोरेखित झाली. त्यानंतर पोलिस आयुक्‍त हरीश बैजल (Harish Baijal) यांनी गुरुवारी 50 वाहतूक पोलिसांना ते कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला. आता ते कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या खिशावर लावले जाणार आहेत.

नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडील 'बॉडी-वॉर्न'मध्ये होणार रेकॉर्ड
सफाईसाठी ड्रेनेजमध्ये उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू!

बॉडी कॅमेरा लावलाच नसेल तर?

बेशिस्त वाहनचालकाला दंड केल्यानंतरही त्याच्याकडून अनेकदा उद्धट वर्तन केले जाते. तर काहीवेळा चुकीच्या पद्धतीनेही कारवाई केली जाते. त्याची सत्यता आता बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यातून स्पष्ट होणार आहे. मात्र, कारवाई करताना एखाद्या वाहतूक पोलिस अंमलदाराने तो कॅमेराच लावला नसेल आणि समोरील व्यक्‍तीकडून आरोप-प्रत्यारोप झाला तर काय, या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे.

बेशिस्त वाहनचालकांसोबत होणारा वाद आता बॉडी वॉर्न कॅमेऱ्यामुळे टळणार आहे. वाहनचालक व वाहतूक पोलिसांमधील कारवाईदरम्यानची वस्तुस्थिती त्या कॅमेऱ्यातून समोर येईल. गैरप्रकारालाही आळा बसेल आणि आरोप-प्रत्यारोपदेखील होणार नाहीत. वाहनचालकांना स्वयंशिस्त लागेल, असा विश्‍वास आहे.

- हरीश बैजल, पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()