सिव्हिलमध्ये 'कोरोना'त कार्य करताहेत भाऊ-बहिणींच्या चार जोड्या

सिव्हिलमध्ये 'कोरोना'त कार्य करताहेत भाऊ-बहिणींच्या चार जोड्या
Updated on
Summary

महामारीत सिव्हिलमध्ये परिचारक असलेल्या भाऊ-बहिणींच्या चार जोड्यांनी चांगली सेवा बजावली. त्यामुळे अनेकांचे भाऊ-बहिण, आई-वडिल आज सुखरुप राहिले आहेत.

सोलापूर: कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट जिल्ह्यातील जवळपास प्रत्येकानेच अनुभवली आहे. महामारीत आहोरात्र सेवा देणाऱ्या महत्वाच्या घटकांमध्ये डॉक्‍टर व परिचारिकांचा/परिचारक आवर्जून उल्लेख करावा लागेल. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कोरोना महामारीत सर्वच डॉक्‍टर, परिचारिका/परिचारक व इतर कर्मचारी वर्ग आहोरात्र झटले आहेत. या महामारीत सिव्हिलमध्ये परिचारक असलेल्या भाऊ-बहिणींच्या चार जोड्यांनी चांगली सेवा बजावली. त्यामुळे अनेकांचे भाऊ-बहिण, आई-वडिल आज सुखरुप राहिले आहेत.

सिव्हिलमध्ये 'कोरोना'त कार्य करताहेत भाऊ-बहिणींच्या चार जोड्या
नातं रक्तापलीकडचं! राखीच्या प्रेमाने बहिण-भावांचे उजळले नाते

कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळपास जाण्यासही अनेक जण घाबरतात. अशा विचित्र काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी सिव्हिलमधील यंत्रणा आहोरात्र झटली. बिरुदेव देवकते व विठाबाई घुगे, सागर उंडाळे व सरिता उंडाळे, राहूल सातपुते व रोहिणी सातपुते, प्रविण वाघमारे आणि प्रिती घेवारे या भावा बहिणींच्या चार जोड्या सिव्हिलमध्ये सेवेत आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या बहिण भावांनी मिळून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा केली आहे. रुग्ण सेवा करताना सागर उंडाळे आणि प्रविण वाघमारे हे कोरोनाबाधित झाले होते. कोरोनावर मात करुन ते पुन्हा आता सेवेत रुजू झाले आहेत.

सिव्हिलमध्ये 'कोरोना'त कार्य करताहेत भाऊ-बहिणींच्या चार जोड्या
पाहा आध्यात्मिक पर्यटनाची 'पंढरी' सोलापूर जिल्हा !

कोरोनामध्ये भितीचे वातावरण खूप होते. आपण जगतो की मरतो अशीच भावना कोरोनाग्रस्तांची होत असते. त्यांची भिती दूर करण्याचे महत्वाचे काम परिचारक व परिचारिका यांनी केले आहे. गेल्या वर्षीच्या रक्षाबंधन वेळी कोरोनाचे सावट अधिक गडद होते. लॉकडाऊनचीही अंमलबजावणी सुरु होती. त्यामुळे मागील रक्षाबंधनला काही मर्यादा होत्या. यंदाच्या रक्षाबंधनाला गतवर्षी पेक्षा चांगली स्थिती आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा उत्साह यंदा अधिक आहे.

सिव्हिलमध्ये 'कोरोना'त कार्य करताहेत भाऊ-बहिणींच्या चार जोड्या
दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !

वाघमोडे बंधूही सेवेत

सिव्हिलमध्ये अनिल वाघमोडे परिसेवक इनचार्ज म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांचे बंधू सागर वाघमोडे हे परिसेवक म्हणून कार्यरत आहेत. सिव्हिलमध्ये भाऊबहिणीच्या जोड्यासोबत ही भावा-भावांची जोडी लोकप्रिय आहे. कोरोना रुग्णांची सेवा बजावताना अनिल वाघमोडे हे कोरोना बाधित झाले होते. कोरोनावर मात करुन ते पुन्हा सेवेत आले आहेत.

सिव्हिलमध्ये 'कोरोना'त कार्य करताहेत भाऊ-बहिणींच्या चार जोड्या
सोलापूर विभागातील 3900 एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत !

गायकवाड भगिनींची सेवा

सिव्हिलमध्ये सुषमा गायकवाड व अंजली गायकवाड या दोघी बहिणी परिचारिका म्हणून सेवा बजावत आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा बजावताना अंजली गायकवाड या कोरोना बाधित झाल्या होत्या. त्यावर मात करून त्या पुन्हा सेवेत आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.