सोलापूर : महापालिकेचा बांधकाम परवाना विभाग आता बंद करुन त्याचे नगररचना विभागात विलिनीकरण करण्यात आले आहे. दोन्ही विभागांचे काम एकमेकांशी निगडीत असतानाही दोन स्वतंत्र विभाग असल्याने कामकाजात सुसूत्रता नव्हती. त्यामुळे आता दोन्ही विभाग एकत्रित करुन त्याचा पदभार नगररचना विभागाचे सहायक संचालक लक्ष्मण चलवादी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बदली झाल्यानंतर यापूर्वी संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील कार्यवाही न झालेले सर्व टपाल, जमालेखे व त्याच्या नोंदी, प्रलंबित प्रकरणांची यादी, प्रलंबित कामांची यादी (न्यायालयीन व महापालिका ठरावानुसार अंलबजावणी न झालेली प्रकरणे), सर्व नोंदवह्यांची स्थिती, प्रलंबित योजना तथा प्रकल्पाची माहिती लिखित स्वरूपात द्यावी, असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. या माहितीची एक प्रत पदमुक्त व पद घेणाऱ्यांना आणि तिसरी प्रत वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे बदली झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यकाळातील प्रलंबित प्रकरणांना त्यांनाच जबाबदार धरले जाणार आहे.
यांच्या झाल्या बदल्या (कंसात बदललेला विभाग)
युसूफ मुजावर (शहर सुधारणा), रामचंद्र पेंटर (नगररचना), शांताराम अवताडे (नगर अभियंता प्रकल्प, मशिनरी), झाकीर नाईकवाडी (नगररचना), अतुल भालेराव (ड्रेनेज), अविनाश वाघमारे (गवसू व आपतकालीन कक्ष), एन. एम. मठपती (विभागीय कार्यालय पाच), नंदकुमार जगधनी (नगररचना), सुनिता हिबारे (विभागीय कार्यालय पाच), भारत सरगर (सार्वजनिक आरोग्य अभियंता), हेमंत डोंगरे (सार्वजनिक आरोग्य अभियंता), प्रकाश सावंत (विभागीय कार्यालय दोन), अविनाश गोडसे (नगर अभियंता- रस्ते), शकील शेख (विभागीय कार्यालय एक), किशोर तळीखेडे (नगर अभियंता), अविनाश अंत्रोळीकर (विभागीय कार्यालय पाच), प्रकाश दिवाणजी (विभागीय अधिकारी- झोन आठ), आरिफ कंदलगावकर (विभागीय कार्यालय आठ), महमद फरकान हिरोली (विभागीय अधिकारी- झोन सात), सतिश एकबोटे (नगररचना), रविशंकर घाटे (नगररचना), आनंद जोशी (विभागीय कार्यालय सात), श्रीकांत खानापुरे (नगररचना), अशोक डाके (सार्वजनिक आरोग्य अभियंता), डी. बी. शिंदे (नगररचना), महिबूब शेख (नगर अभियंता), नागनाथ बाबर (नगररचना), इ.रशीद जरतार (नगररचना), जावेद पानगल (नगररचना), नरेश शेटे (विभागीय कार्यालय चार), विनायक चिंचुरे (विभागीय कार्यालय आठ), आशिष घुले (विभागीय कार्यालय सहा), सलिल वळसंगकर (विभागीय कार्यालय आठ), सलीम पटेल (विभागीय कार्यालय पाच), म.सलीम काखंडीकर (नगर अभियंता), रफिक पठाण (अतिक्रमण), आश्पाक जमादार (नगर अभियंता), फैजअहमद शेख (नगर अभियंता), सलीम कोरबू (विभागीय कार्यालय सहा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.