चहापेक्षा ताकच भारी

शरिरात पाण्याची पातळी वाढ व पोषण
ताक
ताक Sakal
Updated on

सोलापूर - उन्हाळ्यात वर्षभर चहाची सवय जपलेली असताना उन्हाच्या झळा तहान भागवत पोषण देणाऱ्या ताकाची मागणी वाढलेली आहे. खऱ्या अर्थाने बाजारात चहाच्या तुलनेत ताकाची विक्री वाढण्याचे हे एक प्रमुख कारण ठरते. उन्हाळ्याच्या झळा लागत असताना दररोजची चहाची सवय योग्य की ताक प्यावे, अशा द्विधा स्थितीत सापडलेल्यांना त्यातील घटकांची मुल्य समजून घ्यावे लागते. सकाळी ताजेतवाने करणारा चहा दिवसभर पुरत नाही. तर उन्हाळ्यात ताक मात्र अगदी परिपूर्ण पोषण मूल्य देणारे ठरते. गरम तरतरी देणारा चहा मात्र उन्हाळ्यात अधिक त्रास देणारा ठरतो. चहामधून शरिरात पाणी कमी जाते. त्या तुलनेत मात्र ताक हे जास्त पाणी टाकून वापरले तर ते शरीराची उन्हाळ्यात वाढलेली तहान भागवण्यासाठी उपयोगी ठरते. उन्हाळ्यात तहान भागवत पोषण देणारे ताक अधिक उपयुक्त ठरते. म्हणून चहा टाळलेलाच बरा.

ताकाचे पोषणमूल्य

  • ऊर्जा १६९ कि.

  • ज्यूल्स (४० किलो कॅलरीज)

  • कार्बोदके ४.८ ग्रॅम

  • स्निग्ध पदार्थ ०.९ ग्रॅम

  • प्रथिने ३.३ ग्रॅम

  • कॅल्शियम (१२%)

  • ११६ मिलिग्म

चहाचे पोषणमूल्य

कॅटेचीन व कॅटेचीन टॅनीन २६ टक्के

प्रथिने १५·७ टक्के

कॅफीन २·७, टक्के

इतर नायट्रोजनयुक्त पदार्थ ८·७, टक्के

शर्करा ४·१ टक्के

स्टार्च १·९ टक्के

पेक्टीन १२·७ टक्के

सेल्युलोज ७·३, टक्के

लिग्निन ६ टक्के

ताक हे अमृतच मानले जाते ते काही चुकीचे नाही. मात्र ताक हे ताजे म्हणजे असायला हवे. जे ताक नुकतेच तयार केलेले आहे व आंबट लागत नाही ते ताजे मानले पाहिजे. उन्हाळ्यात शरिरातील पाणी व क्षाराची कमतरता ते भरून काढते. चहाचे पोषणमुल्य काहीही नसते पण ताकाचे पोषणमुल्य खुप अधिक आहे. पचनक्रिया चांगली होण्यासाठी ताक खूपच प्रभावी आहे. दही जड असते तर ताक हे हलके असते.

- प्रा. डॉ. ऋषिकेश जाकोरे, न्युट्री वेदा डायट क्लिनीक, सोलापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.