Solapur: राष्ट्रवादी नगरसेवकपुत्राला हातात पिस्तुल घेऊन बुलेटवरील स्टंटबाजी पडली महागात; गुन्हा दाखल

तरुण मुले मुली मोठ्या प्रमाणावर स्टंट करताना दिसून येतात
Solapur
Solapuresakal
Updated on

आजकाल तरुण मुले मुली मोठ्या प्रमाणावर स्टंट करताना दिसून येतात. हा स्टंट अनेकांना महागात पडतो. अशातच आता हातात पिस्तुल घेऊन हात सोडून बुलेट चालविण्याचा स्टंट करणं सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या पुत्राच्या चांगलाच महागात पडला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक पुत्रासह दोघांवर सलगर वस्ती पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

रामवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड आणि राजू भंडारी या दोघांवर सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील कर्मचारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चेतन गायकवाड हात सोडून बुलेट चालवत आहेत आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन स्टंटबाजी देखील केली आहे. त्याबाबतचे काही रिल्स तयार करून गायकवाड आणि राजू भंडारी या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मिडीयावर केलेलं हे रिल गायकवाड आणि भंडारी यांच्या अंगलट आलेला आहे.

Solapur
Bachchu Kadu: बच्चू कडूंना दिलासा; मंत्रालय आंदोलन प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

हे रिल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिस कर्मचारी सचिन शिंदे यांनी नगरसेवक पुत्राविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानंतर रिल्स तयार करणारे चेतन गायकवाड आणि राजू भंडारी यांच्यावर भा. दं. वि. ५०५, २७९ व भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये स्टंटबाजी करण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तूल पोलीसांकडुन जप्त केली जाणार आहे. ती पिस्तूल खरी आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. ती खरी असेल तर पोलिस पिस्तूल जप्तीची कारवाई करू शकतात. तसेच, त्यांच्याडे शस्त्र परवाना आहे का नाही, याची पोलिस तपासात चौकशी होणार आहे.

Solapur
Shivsena: 'तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या...' शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.