Solapur : आवक-जावक नोंदवही गहाळ प्रकरण : तत्‍कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल

टप्‍पा अनुदान : आवक-जावक नोंदवही गहाळ प्रकरण, तीन लिपिकांचाही समावेश
case registered against 5 education officers register book missing case solapur
case registered against 5 education officers register book missing case solapursakal
Updated on

सोलापूर : शाळांच्‍या टप्‍पा अनुदान आवक - जावक नोंदवही गहाळप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील तत्‍कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्‍कालीन तीन प्रमुख लिपिकांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता. ११) रात्री उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

भास्‍करराव बाबर, सुलभा वठारे, जावेद शेख, विद्या शिंदे, जे. एस. शिवशरण या तत्‍कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह सुरेश किसन देवकर, राजेंद्र सोनकांबळे, मुदस्सर शिरवळ या प्रमुख लिपिकांवर गुन्‍हा दाखल झाला आहे.

तत्‍कालीन शिक्षणाधिकारी विद्या शिंदे, जे. एस. शिवशरण यांच्‍या कालावधीतील कॅम्‍पमध्‍ये शाळांच्‍या टप्‍पा अनुदानास वैयक्‍तिक मान्‍यता दिल्‍याचे आदेशावरून दिसते. परंतु, या प्रकरणाच्‍या चौकशीत त्‍या कालावधीतील कॅम्‍प नोंदवही, आवक - जावक नोंदवही शिक्षणाधिकारी कार्यालयात आढळत नाहीत.

case registered against 5 education officers register book missing case solapur
Education Loan घेताना गोंधळ उडतोय? मग ‘हा’ आहे शैक्षणिक कर्ज घेण्याचा सोपा उपाय

याप्रकरणी तत्कालीन लिपिक सोनकांबळे, तत्‍कालीन कनिष्‍ठ सहायक शिरवळ, लोकसेवा प्रशालेचे मुख्‍य लिपिक देवकर यांना १५ सप्‍टेंबर २०२३ रोजी नोटिसा काढल्‍या. त्‍यात त्‍यांच्‍याकडे कोणता पदभार होता, तो कोणाला हस्‍तांतरित केला व कार्यभार सोपविला याची विचारणा केली होती. त्‍याविषयीची कागदपत्रे १७ सप्‍टेंबरपूर्वी सादर करण्‍याची मुदत दिली होती.

त्‍यानुसार तिघांनीही लेखी खुलासा सादर केला. त्‍या खुलाशानुसार ३० डिसेंबर २०२१ रोजी शिरवळ यांनी देवकर यांना संपूर्ण आवक - जावक विभागाचा कार्यभार सोपविला होता. त्‍यात २०१२ ते २०२१ पर्यंतच्‍या एकूण २२ आवक - जावक नोंदवही पदभार यादीनुसार दिले होते. परंतु चौकशीत पदभार घेताना कोणत्या नोंदवह्या घेतल्या, बदलीनंतर कोणत्या नोंदवह्या पदभार घेणाऱ्यांना दिल्या, आवक - जावक आणि कॅम्‍प नोंदवहीची पदभार नोंदवहीत नोंद आढळली नाही.

case registered against 5 education officers register book missing case solapur
Solapur News : सिमेंट दरात उत्पादकांकडून अचानक कृत्रिम दरवाढ; प्रतिपोते ४० रुपयांची भाववाढ

यातील संशयित पाच तत्‍कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह तीन तत्‍कालीन लिपिकांच्या कालावधीत पदभार देते -घेतेवेळी शाळांच्‍या टप्‍पा अनुदानाची आवक - जावक नोंदवही जाणीवपूर्वक नष्‍ट केली अथवा निष्‍काळजीपणाने गहाळ केल्याचा ठपका या चौकशीत ठेवण्यात आला आहे.

त्‍यामुळे २५ सप्‍टेंबर २०२३ रोजी शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी तत्‍कालीन शिक्षणाधिकारी शिंदे, शिवशरण यांच्‍या कालावधीतील कॅम्‍प नोंदवही गहाळप्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्‍याचे उपशिक्षणाधिकारी नाळे यांना आदेश दिले होते. या आदेशानुसार उपशिक्षणाधिकारी नाळे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ मधील कलम ८ व ९ अन्वये फिर्याद दिली आहे.

या कालावधीत नोंदवही गहाळ

१० एप्रिल २०१२ ते ५ जून २०१२ (जावक नोंदवही क्र. २१४३ ते ६०८३), २८ डिसेंबर २०१७ ते १९ जून २०१८ (क्र. ४९०३ ते ६१०९), १९ डिसेंबर २०१८ रोजीची अल्‍पसंख्‍याक कॅम्‍प नोंदवही (०१ ते ७५), डिसेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२२ (८५५२ ते ९७१३), २ जानेवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ (०१ ते १०६५), वर्ष २०१२ पूर्वीची जावक आणि कॅम्‍प नोंदवही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com