मोहोळ - गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्ह्यातून लवकरात लवकर जामीन करण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची स्वतःसाठी व वरिष्ठांना देण्यासाठी मागणी करून तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने व ते पडताळणी कारवाईत निष्पन्न झाल्याने कामती पोलीस ठाण्यातील एका हवालदारावर गुन्हा दाखल झाला आहे. सचिन जाधवर असे गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव आहे.