सावधान, कोरोनासह साथीच्या आजारांत वाढ

महापालिकेची आरोग्य यंत्रणा ढिम्म : ४५० पैकी २५ दवाखान्यांतील रुग्णांचा अहवाल
Caution, an increase in epidemics with corona in solapur cit
Caution, an increase in epidemics with corona in solapur citesakal
Updated on

सोलापूर - शहरात कोरोना, डेंग्यू, चिकुन गुनिया या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. शहरात छोटे-मोठे ४५० दवाखाने असून, त्यापैकी केवळ २५ दवाखान्यांमधील ताप, थंडी रुग्णांची जुजबी माहिती महापालिका गोळा करीत आहे. आरोग्य यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे आणि शून्य उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांचा शोध व विलगीकरण होत नसल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाळा सुरू झाला की, साथीच्या आजारांत वाढ होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच डेंग्यू, चिकुन गुनिया, मलेरिया यांसारखे साथीचे आजार डोके वर काढत आहेत. तब्बल वर्षभरानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने पुन्हा चौथ्या लाटेचा धोका प्रखरतेने दिसून येत आहे. शहरात ओपीडी दवाखाने वगळता छोटे-मोठे ४५० दवाखाने आहेत.

या दवाखान्यांत ताप, थंडीमुळे दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती महापालिका संकलित करून विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोना तपासणी करणे बंधनकारक करावे लागणार आहे. मात्र महापालिकेने केवळ शहरातील नामवंत २५ दवाखान्यांची माहिती संकलित करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी दवाखान्यांनी दिलेली माहिती नोंदविण्याचे काम करतात. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची माहिती मिळणे अशक्य होत आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग कमी झाल्याने नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाबाबतची भीती कमी झाली होती. त्यामुळे लसीकरणामध्येही कोणतेही लक्षणीय वाढ दिसून आली नाही.

कोरोना लसीकरणाचा पहिला डोस बहुतांश नागरिकांनी घेतला असला तरी दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे ७० टक्के इतके आहे. त्यातच बूस्टर डोसची संख्या कमी आहे. संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांबरोबर आता लसीकरणाची गती वाढविण्याचे आव्हान महापालिकेपुढे असणार आहे.

महापालिकेची तोकडी उपाययोजना

साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व्हे, फवारणी, धुवारणी, माहिती नोंद घेणे, रक्त तपासणी अशा विविध कामांसाठी ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरातील महत्त्वाच्या २५ खासगी रुग्णालयांतून ताप, थंडीच्या रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.