बिबट्याच्या शोधासाठी पाणवठ्यांवर कॅमेरे ! रात्रभर गस्त सुरू

बिबट्याच्या शोधासाठी पाणवठ्यांवर कॅमेरे ! रात्रभर गस्त सुरू
Bibtya
BibtyaEsakal
Updated on
Summary

बिबट्याच्या अस्तित्वाचे ठिकाण निश्‍चित करण्यासाठी एमआयडीसी परिसरातील पाणवठ्यांवर कॅमरे लावण्यात आले आहेत.

सोलापूर : कोंडी, चिंचोली एमआयडीसी परिसरात मंगळवारी सकाळी कामगारांना दिसलेला बिबट्या (Leopard) पुन्हा सहा दिवसांत कोणालाही आढळला नाही. बिबट्याच्या अस्तित्वाचे ठिकाण निश्‍चित करण्यासाठी एमआयडीसी परिसरातील पाणवठ्यांवर कॅमरे लावण्यात आले असून, वन विभागाच्या (Forest Department) पथकाची रात्रभर परिसरात गस्त सुरू आहे. अकोलेकाटी येथील शेतकऱ्याने शनिवारी बिबट्याने हल्ला केल्याची अफवा उठवल्यामुळे वन खात्याची पळापळ झाली. नागरिकांनी अफवा पसरवू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार (Forest Range Officer Jayashree Pawar) यांनी केले आहे. (CCTV cameras were installed at Chincholi to search for the leopard-ssd73)

Bibtya
नियम डावलून पळविल्या म्हशी ! दहाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

सध्या पाऊस बंद असल्याने कोरड्या जमिनीवर वन्य प्राण्यांचे ठसे उमटत नाहीत. तशात मागील सहा दिवस या परिसरात कोणत्याही पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्याची नोंद नाही अथवा कोणालाही बिबट्या किंवा बिबट्यासदृश प्राणी दिसलेला नाही. मंगळवारी एमआयडीसी परिसरात आढळलेले ठसे बिबट्याचे होते. यानंतर मात्र कुठेही बिबट्याच्या अस्तित्वाची चाहूल वन विभागाला लागलेली नाही. सध्या गस्ती पथक व रेस्क्‍यू टीम बिबट्याच्या पाळतीवर असून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत.

Bibtya
शहरातील निर्बंध उठवण्याचा महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव

वन विभागाची यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात मागील काही वर्षांत अनेकदा बिबट्यासदृश प्राण्याने हल्ले करून अनेकांना जखमी केले आहे. अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. वांगी नं. 4 (ता. करमाळा) येथे नरभक्षक ठरलेल्या बिबट्याला वरिष्ठांची परवानगी घेऊन ठार मारल्याच्या घटनेपासून जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने वन्य प्राण्यांना रेस्क्‍यू करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. यासाठी आवश्‍यक असलेली वन्य प्राण्यांना बेशुद्ध करण्याची बंदूक काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही वन कर्मचाऱ्यांना ही बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण नागपूर येथे देण्यात आले आहे. यामध्ये श्री. बादमे, सागर जवळगी, श्रीशैल्य पाटील श्री. देवकर यांचा समावेश आहे.

मोहोळ कर्मचारी आहेत पाळतीवर

चिंचोळी येथे बिबट्याचे ठसे आढळण्याअगोदर दोन महिन्यांपूर्वी मोहोळ तालुक्‍यातील भोयरे येथील एका रेडकाला बिबट्याने ठार मारले होते. हा बिबट्या तोच असावा असा कयास आहे. सध्या बिबट्याच्या शोधमोहिमेत मोहोळ येथील वन कर्मचाऱ्यांचा गस्त पथकात समावेश आहे. यामध्ये डी. डी. साळुंखे, वनपाल शंकर कुताटे, वनपाल श्री. सावंत, वनरक्षक सचिन कांबळे, यशोदा आदलिंगे व श्रीमती शिंदे, श्रीमती कोरे यांचा सहभाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()