अखेर अक्कलकोट शहरातील सीसीटीव्ही सुरू! गुन्हेगारीवर येणार नियंत्रण

अखेर अक्कलकोट शहरातील "सीसीटीव्ही' सुरू! गुन्हेगारीवर येणार नियंत्रण
अखेर अक्कलकोट शहरातील "सीसीटीव्ही' सुरू! गुन्हेगारीवर येणार नियंत्रण
अखेर अक्कलकोट शहरातील "सीसीटीव्ही' सुरू! गुन्हेगारीवर येणार नियंत्रणCanva
Updated on
Summary

उत्तर पोलिस ठाण्यात बंडगर यांच्यानंतर तीन पोलिस निरीक्षक येऊन गेले पण सकारात्मक प्रयत्नाअभावी ते सुरू होऊ शकले नाहीत.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) शहरातील वाहतुकीस शिस्त लावणे, गुन्ह्यांवर (Crime) नियंत्रण मिळविणे तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावणे यासाठी अत्यावश्‍यक असलेली पण गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा अक्कलकोट उत्तर पोलिस (Akkalkot Police) ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक अनंतराव कुलकर्णी (Anantrao Kulkarni) यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाने अखेर पुन्हा कार्यान्वित करण्यात यश आले आहे. आज (बुधवारी) एकूण 22 सीसीटीव्ही कॅमेरे, 20 ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी सुरू झाले आहेत. यामुळे नागरिक व व्यापारी बांधवांनी शहर हिताच्या दृष्टीने लोकसहभाग नोंदविला होता त्यांच्यात आता समाधान व्यक्त होत आहे.

अखेर अक्कलकोट शहरातील "सीसीटीव्ही' सुरू! गुन्हेगारीवर येणार नियंत्रण
राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मोहिते-पाटलांची उपस्थिती !

अक्कलकोट शहरात तत्कालीन पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या काळात अस्तित्वात असलेली शिस्त पुन्हा एकदा व्यवस्थित लावण्याची शहरवासीयांची मागणी होती. पूर्वी लोकसहभागातून उभारलेले सीसीटीव्ही कॅमेरे व शहरातील स्पीकर पूर्ववत सुरू करणे, एकेरी वाहतूक नियोजन बरोबर करणे, बस स्थानकासमोरील विक्रेते आणि रिक्षा यांची शिस्त आणि त्यांच्यावरील धाक पूर्वीसारखे ठेवणे अत्यंत आवश्‍यक होते. उत्तर पोलिस ठाण्यात बंडगर यांच्यानंतर तीन पोलिस निरीक्षक येऊन गेले पण सकारात्मक प्रयत्नाअभावी ते सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे असमाधान व्यक्त होत होती. आता त्यातून मार्ग काढून महत्त्वाच्या काही चौकातील सीसीटीव्ही व ध्वनिक्षेपक सुरू झाल्याने सणासुदीच्या काळात नियोजन करणे सुलभ ठरणार आहे. आता पोलिस ठाण्यासमोरील पीटीझेड कॅमेरा सुरू करणे व फत्तेसिंह चौकातून जाणारा कारंजा चौक एकेरी वाहतूक पुन्हा सुरू करणे, अन्नछत्र मंडळ तसेच वागदरी रस्त्यावरील कॅमेरे पुन्हा सुरू करणे आदी कामे करावी लागणार आहेत.

अखेर अक्कलकोट शहरातील "सीसीटीव्ही' सुरू! गुन्हेगारीवर येणार नियंत्रण
पेट्रोलची मूळ किंमत 50! मग महाराष्ट्रात का द्यावे लागतात 107 रुपये?

आता नादुरुस्त झालेले 22 कॅमेरे व 20 ध्वनिक्षेपक पूर्ववत सुरू करण्यात आलेले आहेत. येत्या दिवाळीपर्यंत आणखी लोकसहभाग वाढवून उर्वरित 24 कॅमेरे दुरुस्त करून ते कायमस्वरूपी सुरू राहतील याची काळजी घेतली जाणार आहे. याचा फायदा सुरक्षिततेबरोबरच पोलिस प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

- अनंतराव कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, उत्तर ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.