सोलापूर विभागाला वक्तशीरपणाची शिल्ड मुंबई विभागासह संयुक्त तसेच यांत्रिक अभियांत्रिकी शिल्ड आणि सर्वोत्कृष्ट स्वच्छता विभाग शिल्ड प्रदान करण्यात आली.
सोलापूर : मध्य रेल्वे (Central Railway)सोलापूर विभागाला (Solapur Division) वक्तशीरपणाची शिल्ड मुंबई (Mumbai) विभागासह संयुक्त तसेच यांत्रिक अभियांत्रिकी शिल्ड आणि सर्वोत्कृष्ट स्वच्छता विभाग शिल्ड प्रदान करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus), मुंबई (Mumbai) येथील मध्य रेल्वे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी (Anilkumar Lahoti) यांनी वर्ष 2020-21 मध्ये 132 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि अनुकरणीय कार्यासाठी वार्षिक पुरस्कार प्रदान केले. महाव्यवस्थापक लाहोटी आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभोय (B. K. Dadabhoy) यांच्या उपस्थितीत सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक एल. के. रणयेवले आणि विभागीय यांत्रिक अभियंता सूर्यकांत मुंजेवार यांना स्वच्छता, रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा आणि यांत्रिक अभियांत्रिकी अशा ती शिल्ड्स प्रदान केले.
सोलापूर विभागामध्ये किसान रेल्वेसाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी प्रदीप हिरडे यांना महाव्यवस्थापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केलेली कामगिरी आणि सोलापूर विभागातील रेल्वे परिसरात सुरक्षा राखण्यात यश मिळाल्यामुळे विभागीय सुरक्षा आयुक्त श्रेयश चिंचवडे यांना महाव्यवस्थापकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सोलापूर विभागात एच. आर. एम. एस. मॉडेलची अंमलबजावणी तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे सेटलमेंटची भरपाई आणि वारसदारांना अनुकंपा आधारावर नियुक्ती तत्काळ करण्यात आली.
रेल्वे कर्मचाऱ्यांचे तक्रार निवारण आणि कल्याणकारी कार्यात मोठे यश लाभले आहे. या कामगिरीकरिता सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी सुरेंद्रसिंह बारहाट यांना पुरस्कार मिळाला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागाने सर्व विभागांमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. यामुळे सर्वच पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.