शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वरच्या केंद्र शाळेला भेट दिली.
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad School) जिल्ह्यातील जवळपास 165 शाळांमध्ये यंदा पहिल्यांदाच सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सीईओ मनीषा आव्हाळे (CEO Manisha Awhale) यांनी घेतला. त्यातील सावळेश्वरच्या केंद्र शाळेला त्यांनी आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी भेट दिली. सेमी इंग्रजीच्या (Semi English) इयत्ता पहिलीच्या वर्गावर त्यांनी तास घेत चिमुकल्यांना प्रोत्साहित केले.
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ, पुस्तकांचे वाटप करण्यात आले. गणवेशही काही दिवसात मिळतील. दरम्यान, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सावळेश्वर (ता. मोहोळ) येथील केंद्र शाळेतील चिमुकल्यांसोबत संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विस्ताराधिकारी मल्लिनाथ स्वामी, केंद्रप्रमुख बापूसाहेब पाटील, मुख्याध्यापक चंद्रकांत कमळे, दत्तात्रय माळी, कैलास शिंदे, राजन ढवण, आबासाहेब चाफाकरंडे, दत्तात्रय खंडेराव, तानाजी धावणे, दीपक गायकवाड, अजय मटे, राजेंद्र लांडगे, कालिदास गावडे, रोहन सरवळे, मंजुषा चव्हाण, काशिमबी तांबोळी, श्रीकांत ढमढेरे, हणमंत उराडे, बिरुदेव शेंडगे, बापू गावडे, सीताराम गावडे, नारायण साठे आदी उपस्थित होते.
सीईओ आव्हाळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळांप्रमाणे सर्व सुविधा असाव्यात यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. पण, विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, सर्व विद्यार्थ्यांंना चांगले शिकवून त्यांना सर्वांसोबत आणावे. आता पुस्तके मिळाली आहेत, गणवेश पण काही दिवसात मिळतील. विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासून चांगला अभ्यास करावा, सर्वांना माझ्या शुभेच्छा.
शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वरच्या केंद्र शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी पोषण आहार आणि किचन शेडबद्दल माहिती घेतली. त्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी देखील केली. खोल्यांची दुरवस्था पाहून त्यांनी किचन शेड मोठे करून त्याच परिसरात विद्यार्थ्यांना पोषण आहार खायला बैठक व्यवस्था करा, असे आदेश मुख्याध्यापकांना दिले. 3 महिन्यात हे काम पूर्ण व्हायला पाहिजे, मी ज्यावेळी पुढच्यावेळी शाळेत येईन तेव्हा ते काम पूर्ण झालेले हवे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.