कुलगुरूंच्या रडारवर विद्यापीठाच्या कुलसचिव!डॉ. माया पाटील प्रकरणात मागविला खुलासा; नियुक्तीचा अहवालही शासनाला जाणार

सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील इतिहास व पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांच्या 'फोन कॉल' प्रकरणात प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.
Solapur University
Solapur UniversitySakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील इतिहास व पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांच्या 'फोन कॉल' प्रकरणात प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. 8 तारखेपर्यंत खुलासा अपेक्षित आहे.

कुलसचिव योगिनी घारे यांनी डॉ. पाटील यांना कॉल करुन एप्रिल महिन्यात झालेल्या 'उच्च शिक्षणातील स्त्री नेतृत्व' या विषयावरील कार्यशाळेचा हिशोब द्यायला सांगितले. त्यावेळी डॉ. पाटील त्यासंदर्भात सांगताना अपमानित केल्याचे बोलले गेले. हा विषय प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्यापर्यंत गेला. पण, हा विषय वित्त व लेखा विभागाशी संबंधित असतानाही या विभाग प्रमुखांनी त्यासंदर्भात का माहिती दिली नाही, कुलसचिव घारे यांनी डॉ. पाटील यांना का कॉल केले, या प्रश्नांची उत्तरे आता कुलगुरू शोधणार आहेत. तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. कामत यांनी कुलसचिव घारे यांना या प्रकरणी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण काहीही बोललो नसून माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, कायद्यान्वये कलम 21 नुसार समोरच्याला न सांगता कॉल रेकॉर्डिंग करणे हाही गुन्हाच आहे. तसेच सर्वच्या सर्व कॉल रेकॉर्डिंग केले असतिल हे खात्रीशीर सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही या प्रकरणी आठ दिवसात लेखी खुलासा करावा आणि कॉल रेकॉर्डिंग पुरावा होत नाही, असे कुलगुरू डॉ. कामत यांनी घारे यांना बजावले आहे. मंगळवारी (ता. 8) ही मुदत संपणार आहे. पण, आपण डॉ. माया पाटील या अपमानित होतील असे काहीही बोललो नाही यावर कुलसचिव घारे ठाम आहेत. त्यामुळे कारवाई करण्यापूर्वी डॉ. पाटील यांचेही ऐकून घेतले जाऊ शकते. या प्रकरणात चौकशी करून कुलसचिवांवर कारवाई करावी, अशी मागणी प्राध्यापक संघटनेनेही केली असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर आता कुलगुरू काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(थेट नियुक्तीचा वाद अजून मिटता मिटेना...) : मुंबई विद्यापीठात कार्यरत योगिनी घारे यांची थेट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी झालेली नेमणूक अनेकांना खटकत आहे. त्यांच्या नेमणुकीस आता 10 महिने होत आहेत. तरी तो वाद तथा शंका दूर होऊ शकली नाही. विद्यापीठाच्या सिनेट, अधिसभा अशा अनेक बैठकांमध्ये तो विषय सातत्याने चर्चेला गेला. आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी यासंदर्भातील सखोल माहिती (कागदपत्रांसह) मागविली आहे. कुलगुरू आता त्यासंबंधीचा अहवाल पुढील आठवड्यात शासनाला सादर करणार आहेत. त्यामुळे त्याठिकाणी काय कारवाई होणार, याचीही उत्सुकता असणार आहे.

(थेट पदावरून हटविण्याचा कुलगुरूंना अधिकार) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांचा प्रोबेशनल (परिविक्षाधिन) कालावधी सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या काळात कुलगुरू संबंधित व्यक्तीविरुद्ध अनेक तक्रारी आल्या असतिल आणि त्यात तथ्य आढळल्यास थेट पदावरून काढून टाकण्याची कारवाई देखील करू शकतात. कुलगुरूंना त्याचे अधिकार आहेत. त्यामुळे घारे यांच्या नेमणुकीची कागदपत्रे पडताळणीनंतर त्यांची निवड चुकीची आहे की बरोबर हे स्पष्ट होणार आहे. कागदपत्रे पात्र असल्यास कुलसचिव म्हणून त्याच कायम राहतील, हे निश्चित.

कॉल रेकॉर्डिंग हा पुरावा होणार नाही डॉ. माया पाटील यांच्या संदर्भातील प्रकरणाचा खुलासा कुलसचिव योगिनी घारे यांच्याकडे मागितला असून कॉल रेकॉर्डिंग हा पुरावा होणार नाही, असेही त्यांना सांगितले आहे. त्यांचा खुलासा आल्यावर योग्य ती कारवाई करू. तसेच शासनाने त्यांच्या कुलसचिवपदी नेमणुकीची देखील माहिती मागविली असून त्याचा अहवाल लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पाठवला जाणार आहे, असे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी 'सकाळ'शी बोलताना सांग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.