बालकांची 10 जूनपासून तपासणी : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

बालकांची 10 जूनपासून तपासणी : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी
Updated on
Summary

या कालावधीत निदानासाठी आवश्‍यक असलेल्या रक्त व लघवी चाचण्या शिबिर होणार आहे. याच कालावधीत उपचारात्मक सेवाही दिला जाणार असल्याची माहिती सीईओ स्वामी यांनी दिली.

सोलापूर : कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून जिल्हा परिषदेने 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी (health check up) करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 जून ते 10 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी (health check up) होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (chief executive officer dilip swami) यांनी दिली. या मोहिमेसाठी तालुका व गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. (chief executive officer dilip swami said children in solapur district will undergo a health check up from june 10)

या मोहिमेतील तालुका स्तरीय समिती सदस्यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण 4 जूनला होणार आहे. 5 जून ते 6 जून या दोन दिवसांमध्ये गाव निहाय कृती नियोजन होणार आहे. तपासणी पथकातील सदस्यांचे प्रशिक्षण 7 ते 9 जून या कालावधीत होणार आहे. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षिका केंद्रप्रमुख यांचे प्रशिक्षण 7 ते 9 जून दरम्यान होणार आहे. 10 जून ते 10 जुलै या कालावधीत मुलांची प्रत्यक्ष गाव निहाय आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

या कालावधीत निदानासाठी आवश्‍यक असलेल्या रक्त व लघवी चाचण्या शिबिर होणार आहे. याच कालावधीत उपचारात्मक सेवाही दिला जाणार असल्याची माहिती सीईओ स्वामी यांनी दिली.

प्रत्येक गावातील सर्व मुलांची आरोग्य तपासणी करून निदान झालेल्या सर्व मुलांना उपचारात्मक सेवा देण्याची व्यवस्था करावी. त्यांचे समुपदेशन व औषधोपचार करावे. बालकांचे वजन, आजार व उपचार, अंगणवाडी मार्फत आहार मिळणार याची पडताळणी करावी, गंभीर आजारी बालकांना पंढरपूर येथील बाल उपचार केंद्राची संदर्भ सेवा द्यावी, अशी स्पष्ट सूचनाही सीईओ स्वामी यांनी केली आहे.

बालकांची 10 जूनपासून तपासणी : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी
हृदयद्रावक : कोरोनाला हरविले पण अपघाताने हिरवले..सात वर्षाची चिमुकली बचावली

गावनिहाय चाचणी शिबिर

या मोहिमेत 0 ते 18 वयोगटातील बालकांची रक्त तपासणी व एचबी तपासणी होणार आहे. वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी एचएल लॅबच्या सहकार्याने निदानासाठी आवश्‍यक असलेले रक्त व लघवी चाचण्या करण्यासाठी गावनिहाय शिबिर आयोजित करावे, अशी स्पष्ट सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिली आहे.

बालकांची 10 जूनपासून तपासणी : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी
तुमचे फेक फेसबूक अकाउंट कोणीही उघडू नये म्हणून करा 'या' गोष्टी

आकडे बोलतात

-0 ते 18 वयोगटातील बालकांची संख्या : नऊ लाख 77 हजार 932

- शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या : दोन लाख 90 हजार 325

-6 ते 15 वयोगटातील बालकांची संख्या : 5 लाख 80 हजार 678

-16 ते 18 वयोगटातील बालकांची संख्या : एक लाख सहा हजार 929

- ग्रामीणमधील एकूण बालके : नऊ लाख 77 हजार 932

- शहरी भागातील बालकांची संख्या : दोन लाख 14 हजार 943

(chief executive officer dilip swami said children in solapur district will undergo a health check up from june 10)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.