मोहोळ : सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य द्या, कार्यकर्त्यांनी सुचवलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावली जातील, विकास निधी सर्वसामान्य पर्यंत पोहोचवा "बाळासाहेबांची शिवसेना" ही जनतेची कामे करण्यासाठीच सत्तेवर आली आहे. तालुक्यातील रखडलेल्या व नवीन विकास कामांची यादी घ्या त्यावर जास्तीचा निधी देऊ असा आत्मविश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी दिली.
मुंबई येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक "नंदनवन" या ठिकाणी संपन्न झाली त्यावेळी जिल्हाप्रमुख चवरे यांनी मोहोळ तालुक्यातील गावांच्या विकासासाठी निधीची मागणी केली, त्यात पेनुर, पाटकुल, टाकळी सिकंदर, आढेगाव, अंकोली, सौंदणे, नजीक पिंपरी, नांदगाव, ढोक बाभुळगाव, भांबेवाडी, रामहिंगणी, सय्यद वरवडे या गावांचा समावेश आहे, तर पेनुर जिल्हा परिषद गटातील ही सर्व गावांचा समावेश आहे.
80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पने प्रमाणे आपण काम करणार असल्याचे जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले. आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शना खाली तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना काम करीत असून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी पेनुर येथे आरोग्य वर्धिनी केंद्राची मागणीही केल्याचे जिल्हा प्रमुख चवरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे, आरोग्य मंत्री डॉ सावंत, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल या साठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले.
65 मिलिमीटर ची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार-----
पावसाळ्यात अनेक गावात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.त्यात उभी पिके ,विविध फळबागा यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागितल्यास 65 मिलिमीटर पाऊस पडला असेल तरच नुकसानीस तो शेतकरी पात्र ठरतो अशी शासन अट आहे. त्यामुळे नुकसान होऊनही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहतो त्यासाठी ती अट मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.