आज मोबाईलचा वापर महत्त्वाचा झाला आहे. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच मोबालचा वापर करतात. काही पालक मनोरंजनासाठी लहान मुलांच्या हाती मोबाइल देतात. परिणामी सहा ते १५ वयोगटातील मुले आभासी जगालाच खरे मानू लागले आहेत. ही मुले समाजमाध्यमांवर आपण काय पाहतो हे समजू नये यासाठी पालकांना ब्लॉक करून रिल्स व ऑनलाइन गेम्सच्या आहारी जात आहेत.