राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा सिनेस्टाईल पाठलाग! चारचाकी वाहनासह 800 लिटर हातभट्टी जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. 18) पहाटेच्या सुमारास नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणी एका बोलेरो वाहनातून (MH-13-AQ-0197) आठशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.
Excise department
Excise departmentSakal
Updated on

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. 18) पहाटेच्या सुमारास नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणी एका बोलेरो वाहनातून (MH-13-AQ-0197) आठशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

नागरिकांनी द्यावी अवैध व्यवसायाची माहिती...सोलापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत. अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाई केली जात आहे. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती किंवा वाहतूक, विक्री अथवा साठा (बनावट दारु, परराज्यातील दारु) याबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.

शनिवारी (ता. १८ मार्च) पहाटे दोनच्या सुमारास सोलापूर- विजयपूर महामार्गावरून चारचाकी वाहनातून हातभट्टी दारु वाहतूक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला होता. काही वेळाने नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) हद्दीत एक बोलेरो जीप रस्त्यावरुन येताना दिसली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. पण, तो न थांबता तसाच भरधाव वेगाने निघाला. अधिकार्‍यांनी त्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यास पकडले. त्या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन इसम मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून जीपची झडती घेतली. त्यावेळी जीपमध्ये हातभट्टी दारुने भरलेल्या ८ रबरी ट्युब मिळून आल्या. वाहनातील दोघांना अटक करुन वाहन व हातभट्टी दारु जप्त करण्यात आली आहे. जप्त हातभट्टीची वाहतूक करणारे अमोल भोजु पवार व श्रीनाथ सुरेश राठोड (दोघेही रा. मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर) अशी त्या अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा,१९४९अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

या कारवाईत ८०० लिटर हातभट्टी दारु व वाहन, असा एकूण सहा लाख 40 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त पुणे विभाग मोहन वर्दे व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे व प्रशांत इंगोले यांच्या पथकाने पार पाडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()