टोलचा झोल सुरू! सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर दोन टोल नाके

टोलचा झोल सुरू! सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर दोन टोल नाके
टोलचा झोल सुरू! सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर दोन टोल नाके
टोलचा झोल सुरू! सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर दोन टोल नाकेCanva
Updated on
Summary

चाळीस किलोमीटरच्या महामार्गावर दोन टोल नाके झाल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा "टोलचा झोल' सर्वसामान्यांना आकलन होणे कठीण आहे.

वळसंग (सोलापूर) : चाळीस किलोमीटरच्या महामार्गावर दोन टोल नाके (Toll Plaza) झाल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा 'टोलचा झोल' सर्वसामान्यांना आकलन होणे कठीण आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India), रस्ते आणि राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या (Ministry of Roads and Highways Government of India) वतीने सोलापूर (Solapur) - अक्कलकोट (Akkalkot) राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक 150 या नवीन रस्त्याचे काम सुरू असून, सोमवार (ता. 20) पासून या मार्गावरून प्रवास करण्याकरिता आता वाहनधारकांना टोल भरावा लागत आहे.

टोलचा झोल सुरू! सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर दोन टोल नाके
नोकरीनिमित्त तरुण बनले 'पुणेरी सोलापूरकर'!

टोलवसुलीची सुरवात झाली आहे; परंतु या टोल नाका परिसरातील पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंतच्या वाहनधारकांना टोल माफी करावी, या राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सवलत मिळावी. स्थानिक रहिवाशांना तसेच प्रकल्पग्रस्तांना टोल नाक्‍यावर कामावर घ्यावे अशी मागणी दक्षिण सोलापूर प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष मोसिन तांबोळी यांनी केली. अन्यथा, बुधवारी 22 सप्टेंबर रोजी तोडफोड आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर - अक्कलकोट हा राष्ट्रीय महामार्ग अजून पूर्ण झाला नाही. अद्याप बरीच कामे अर्धवट आहेत. तरी देखील टोल आकारण्यात येत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे दररोज अनेक अपघात या मार्गावर होत आहेत. याला जबाबदार कोण, असाही सवाल उपस्थित होत आहे. रस्ता 40 किलोमीटरचा असला तरी फक्त 27 किलोमीटरची टोल आकारणी सध्या करत असल्याचे टोल व्यवस्थापनाने सांगितले.

टोलचा झोल सुरू! सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर दोन टोल नाके
शहरातील नागरिकांमध्ये 80 टक्‍के अँटीबॉडीज! सिरो सर्व्हेचा अंदाज

सोलापूर - अक्कलकोट महामार्गावरील राज्य शासनाचा टोल नाका लवकरच बंद होणार आहे. त्याबाबत शासनाबरोबर पत्रव्यवहार सुरू आहे
- शाहू पाटील, स्वतंत्र अभियंता, एस. के. एंटरप्राइजेस

स्थानिक वाहनधारकांनी फास्टटॅग नोंदणी करून घेतल्यास टोलमाफी देता येईल; तसेच 70 टक्के स्थानिक नोकरभरती लवकरच करण्यात येणार आहे.
- राजेंद्र तापडे, व्यवस्थापक, टोल गेट वळसंग

बातमीदार : दिनकर नारायणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.