चिलटं डोळ्यांभोवती का घोंघावतात? चिलटांपासून अशी घ्या खबरदारी

डोळ्यांभोवती उडणाऱ्या चिलटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत
flying Insects
flying InsectsCanva
Updated on
Summary

न चावता, रक्त न शोषता वारंवार डोळ्यांभोवती घोंघावत चिलटं आपले अस्तित्व दाखवत आहेत. मच्छर अगरबत्ती, लिक्विड मशिन, विषारी औषध या उपायांनाही चिलटं जुमानत नसल्याचे दिसते.

माळीनगर (सोलापूर) : कितीही हाकललं तरी गुंऽऽऽ गुंऽऽऽ करीत डोळे व कानाभोवती पिंगा घालणाऱ्या चिलटांचा (insects) उपद्रव सध्या सगळीकडेच वाढल्याचे दिसत आहे. सतत घोंघावणाऱ्या चिलटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात चिलटांनी उच्छाद मांडला आहे. भल्या- भल्यांना चिलटांचे उपद्रवमूल्य कळून चुकले आहे. स्वच्छता आणि साध्या उपायांनी चिलटांचा उपद्रव कमी करता येऊ शकतो, असे जुनी- जाणती मंडळी सांगतात. मात्र, कितीही स्वच्छता राखली तरी त्याचा उपद्रव काही कमी होताना दिसत नाही. (Citizens are annoyed by the flying Insects around their eyes)

flying Insects
बार्शीत आढळलेला म्युकरमायकोसिस बुरशीच्या दोन प्रजातींचा! तज्ज्ञांचे संशोधन

न चावता, रक्त न शोषता वारंवार डोळ्यांभोवती घोंघावत चिलटं आपले अस्तित्व दाखवत आहेत. मच्छर अगरबत्ती, लिक्विड मशिन, विषारी औषध या उपायांनाही चिलटं जुमानत नसल्याचे दिसते. पूर्वी जास्त चिलटं झाली की बांधावरील शेराची फांदी हमखास घरात अडकवली जायची. पण शेर वनस्पतीही आता दुर्मिळ झाली आहे.

flying Insects
अखेर उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द ! जलसंपदा विभागाचा लेखी आदेश

फ्रुटफ्लाय (फलमक्षिका) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कीटकाच्या अनेक प्रजाती आहेत. फळे, भाजीपाला याकडे चिलटं आकर्षित होतात. आपले डोळे सतत ओलसर असतात. अंडी घालण्यासाठी त्यांना ओलाव्याची गरज असते. त्यामुळे चिलटं डोळ्यांभोवती सतत घोंघावतात. घरातील ओलावा कमी करणे, हा चिलटांचा प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय मानला जातो.

चिलटांचा उपद्रव रोखण्यासाठी हे करायला हवे

  • बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे घराबाहेरच धुवावीत. ते धुतलेले पाणी घरापासून दूर टाकावे. ती भाज्या, फळे घरात आणल्यावर पुन्हा बेसिनमध्ये धुवून थेट फ्रीजमध्ये ठेवावीत

  • फळे खाकी कागदाच्या पिशवीत ठेवून पिशवीचे तोंड बंद करावे. खराब झालेली फळे घरापासून शक्‍य तितक्‍या लांब फेकून द्यावीत

  • स्वयंपाक घरातील ज्यूसचे जार, सॉसच्या बाटल्या उघडून बंद करताना त्यांची तोंडे स्वच्छ पुसून घट्ट झाकण लावावे

  • खरकटे अन्न, रस काढलेल्या फळांच्या साली थोड्या वेळासाठी देखील घरात ठेवू नयेत

  • बेसिनचे पाणी वाहून नेणारे पन्हाळ सुस्थितीत ठेवावे

  • बाटल्या बॉटल ब्रश वापरून गरम पाण्याने साफ कराव्यात

  • फरशा पुसल्यानंतर ते पाणी लगेच बाहेर फेकावे

  • सांडलवंड झाल्यास तत्काळ साफसफाई करावी

  • घराजवळ खोल खड्डा खोदून खरकटे अन्न, खराब फळे, फळांच्या साली त्या खड्ड्यात टाकून पालापाचोळा अथवा मातीने झाकून टाकाव्यात. त्यापासून परसबागेसाठी खत तयार होईल

पाऊस, आर्द्रता यामुळे चिलटांचा प्रादुर्भाव वाढतो. घरातील सर्व अन्नपदार्थ, इतर वस्तू झाकून ठेवून क्‍लोरीपॉइन पॉस साधारण 40 मिली 15 लिटर पाण्यात घेऊन घरात व घराबाहेर फवारावे.

- डॉ.पांडुरंग मोहिते, कीटकशास्त्रज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.