यंत्रमाग कामगाराच्या बोनसप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तेक्षेप करावा : नरसय्या आडम 

Adam Mastar.jpeg
Adam Mastar.jpeg
Updated on

दक्षिण सोलापूर ः सोलापूर शहरातील यंत्रमाग कामगारांना 8.33 टक्के दिवाळी बोनस व लॉकडाउन काळातील नुकसान भरपाईचा पगार मिळवून देण्याबाबत केंद्रीय औद्योगिक न्यायालयाच्या निकालास अनुसरून बोनस अदा करणे कायदेशीर बंधनकारक असताना सहाय्यक कामगार आयुक्तांनी तथाकथित कामगार संघटना आणि यंत्रमागधारक यांच्यात कामगारांचा विश्वासघात करणारा करार केला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा, असे पत्र माजी आमदार नरसय्या आडम यांनी ई-मेलद्वारे पाठवले आहे. 

या पत्रात म्हटले आहे, की सोलापूर परिसरातील यंत्रमाग उद्योगात सुमारे 45 हजार कामगार तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. त्यांना कामगार कायद्याचा कोणताच लाभ दिला जात नाही. "सिटू'च्या वतीने लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियनकडून गेल्या 25 ते 30 वर्षापासून मोठे आंदोलने, धरणे, निदर्शने व जेलभरो करूनही यंत्रमागधारकांचे कोणतेही समर्थन मिळाले नाही. यंत्रमाग युनियनने यंत्रमाग उद्योगा विरुद्ध भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल करून अंतिम निर्णय घेऊन कामगारांना भविष्य निर्वाह निधी लागू असल्याचा निकाल दिला. या निकालाविरुद्ध यंत्रमाग उद्योजक न्यायलयात गेले असता न्यायालयाने निकाल देऊन पी.एफ. आयुक्त यांचा निकाल कायम करून यंत्रमाग कामगारांना पी.एफ. लागू असल्याचे आदेश केले. त्यानंतर आजपर्यंत यंत्रमाग कामगारांचे फंड बोटावर मोजण्या इतकेच कारखानदार जमा करीत असल्याचे दिसून आले आहे. 

कामगारांना भविष्य निर्वाह निधी लागू झाल्यानंतर वर्षाकाठीचे बोनस म्हणून 8.33 टक्के बोनसची रक्कम देणे कायद्याने क्रमप्राप्त असताना यंत्रमाग उद्योजक बोनस देण्यास नकार देऊन कामगारांची पिळवणूक करीत आहेत. यंत्रमाग युनियनमार्फत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या पुढे सतत तीन वर्षापासून कामगारांना सुधारित किमान वेतनाप्रमाणे किमान वेतन व वर्षाकाठी 8.33 टक्के बोनससाठी तगादा आहे. याकडे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ऐन दिवाळी सणासमोर आर्थिक अडचण निर्माण झाल्याने कामगारत कमालीचे असंतोषाचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून बोनस व लॉकडाऊन काळातील नुकसानभरपाईचा पगार मिळवून देणे कामी त्वरित सहाय्यक कामगार आयुक्तांची तत्काळ चौकशी करावी व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश निगर्मित करावेत. दिवाळीच्या आत कामगारांना 8.33 टक्के प्रमाणे बोनस मिळवून द्यावा, असे पत्रा माजी आमादर आडम यांनी पाठवले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.